
ज्योतिषशास्त्रानुसार, राहु आणि केतु हे पापग्रह असून एकाच वेळी राशीचक्रात गोचर करतात. दोन्ही ग्रह एकमेकांच्या अगदी समोर असतात आणि इतर ग्रहांच्या तुलनेत उलट गोचर करतात. त्यामुळे या ग्रहांची स्थिती बदलली की राशीचक्रावर परिणाम दिसून येतो. दोन्ही पापग्रह एका राशीच दीड वर्षे म्हणजेच 18 महिने राहतात. त्यामुळे हा 18 महिन्यांचा कालावधी काही राशींसाठी बरा, तर काही राशींसाठी अडचणींचा ठरतो. ज्योतिष्यांच्या मते, पापग्रहांच्या या गोचरामुळे व्यक्तीच्या विचार, निर्णयक्षमता, कौटुंबिक जीव आणि भविष्यातील योजनांवर परिणाम होतो. राहू आणि केतू हे व्यक्तीच्या जीवनात आकस्मिक घटना, गोंधळ, महत्त्वाकांक्षा, मानसिक अशांतता निर्माण करतात. 25 नोव्हेंबर 2026 रोजी राहु आणि केतु हे दोन्ही ग्रहांचं गोचर होणार आहे. दुपारी 4.34 मिनिटांनी हे ग्रह आपली राशी बदलणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, राहु मकर राशीत, तर केतु कर्क राशीत प्रवेश करेल. त्यामुळे पुढचे 18 महिने चार राशींना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
या राशींसाठी गोचर कालावधी ठरणार त्रासदायक
मकर: राहु ग्रह शनीच्या कुंभ राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करेल. त्यामुळे या काळात प्रगती आणि यश मिळवण्याची इच्छा आणखी प्रबळ होईल. त्यामुळे एखादा निर्णय घाईगडबडीत घेतला जाण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत संयम बाळगणं फार गरजेचं आहे. अन्यथा भविष्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वरिष्ठांशी संवाद साधतना संयम राखणं गरजेचं आहे.
कर्क : केतू सूर्याच्या सिंह राशीतून बाहेर पडून चंद्राच्या कर्क राशीत प्रवेश करेल. त्यामुळे या राशीच्या पहिल्या स्थानात केतु असणार आहे. हे स्थान स्वभाव, आरोग्य, व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वासाशी संबंधित असते. या काळात, तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक अंतर्मुख होऊ शकता आणि लहानसहान गोष्टींवर विचार करत बसण्याची तुमची प्रवृत्ती वाढू शकते.
Devutthani Ekadashi 2026: कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला 'देवउठनी एकादशी' किंवा 'प्रबोधिनी एकादशी' असे म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू चार ...
धनु : धनु राशीसाठी राहू द्वितीय स्थानात (धन व कुटुंब भावात) आणि केतू अष्टम स्थानात (आयुष्य व गूढ रहस्य भावात) प्रवेश करतील. दुसरं स्थान धनसंचय, कुटुंब, वाणी आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित असते. तर आठवं स्थान अचानक घडणाऱ्या घटना, आरोग्य, संशोधन आणि गूढ विषयांशी संबंधित मानले जाते. आर्थिक बाबी, कौटुंबिक संबंध आणि वैयक्तिक निर्णयांच्या बाबतीत सावधगिरी बाळगावी लागणार आहे.
तूळ: या राशीत राहू चतुर्थ स्थानात (सुख व माता भावात) आणि केतू दशम स्थानात (कर्म व करिअर भावात) प्रवेश करेल. चौथं स्थान घर, वाहन, मालमत्ता, माता आणि कौटुंबिक सुखाशी संबंधित असते. दहावं स्थान नोकरी, व्यवसाय, करिअर, सामाजिक प्रतिष्ठा आणि कामाच्या जबाबदाऱ्यांचे मानले जाते. या काळात कामाच्या ठिकाणी काही अनिश्चितता निर्माण होऊ शकते.
(Disclaimer: या बातमीतील माहिती धार्मिक श्रद्धा आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. प्रहार न्यूज त्याचे समर्थन करत नाही.)






