Nashik Crime : इन्स्टाग्रामवर ड्रेसची रील पाहून ड्रेस ऑर्डर केला अन् तरुणीला 99 हजारांचा ऑनलाइन गंडा बसला , नेमकं काय घडलं ?

नाशिक : सोशल मीडियावर आकर्षक ड्रेसची रील पाहून ऑनलाइन खरेदी करणे सिडको परिसरातील एका तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. ड्रेस ऑर्डर करण्याच्या बहाण्याने सायबर भामट्यांनी तरुणीला विविध शुल्क भरण्यास सांगत तब्बल ९९ हजार ६०५ रुपयांची फसवणूक केली. पैसे भरूनही ड्रेस मिळाला नाही आणि उलट पैशांची मागणी सुरूच राहिल्याने तरुणीने अंबड पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तनुजा लक्ष्मण चौरे (वय २३, रा. सिडको) असे फसवणूक झालेल्या तरुणीचे नाव आहे. (Nashik Crime News)



नेमकं काय घडलं ?


काही दिवसांपूर्वी तनुजा सोशल मीडियावर रील्स पाहत असताना तिला 'fashionista_attic_lady' या इन्स्टाग्राम आयडीवर ड्रेसची जाहिरात दिसली. ड्रेस आवडल्याने तिने त्याचा स्क्रीनशॉट काढून संबंधित आयडीवर संदेश पाठवला आणि ड्रेसची ऑर्डर नोंदवली. यानंतर ड्रेसच्या प्रोसेसिंगसाठी पैसे भरावे लागतील, असे सांगून संशयितांनी तिच्याशी संपर्क साधला.


संशयितांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून तनुजाने वेळोवेळी ऑनलाइन पैसे पाठवले. ७०१४१३९९९३ या मोबाइल क्रमांकावर तसेच ९८७५७९३२४९ आणि 'rajmeena01@airtel' या फोन-पे आयडीवर तिने एकूण ९९ हजार ६०५ रुपये वर्ग केले. मात्र, पैसे भरूनही ऑर्डर केलेला ड्रेस त्यांना मिळाला नाही. विशेष म्हणजे, ड्रेस पाठवण्याऐवजी संशयितांकडून वारंवार आणखी पैशांची मागणी केली जाऊ लागली. (Nashik Crime News)






अंबड पोलिसांत गुन्हा दाखल


आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे अज्ञात इन्स्टाग्राम आयडीधारक, संबंधित मोबाइल क्रमांक आणि फोन-पे आयडीधारकांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सोशल मीडियावरील जाहिराती पाहून ऑनलाइन खरेदी करताना विक्रेत्याची खातरजमा करावी आणि अनोळखी व्यक्तींना प्रक्रिया शुल्काच्या नावाखाली पैसे पाठवताना सावधगिरी बाळगावी, हे या घटनेतून अधोरेखित होते.

Comments
Add Comment

Anti-Narcotics Van: अमली पदार्थांविरोधी मोहिमांसाठी मुंबई पोलिसांना ‘अँटी-नार्कोटिक्स व्हॅन’

मुंबई : अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री रोखण्यासह गुन्ह्यांच्या तपासातील त्रुटी दूर करण्यासाठी मुंबई

Kurla Crime: कुर्ल्यात तरुण जोडप्याला हॉकी स्टिक, बेल्टने मारहाण; 8 अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल

कुर्ला येथील एका बागेत किशोरवयीन जोडप्याला मारहाण केल्याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी आठ मुलांना ताब्यात घेतले

Shiv Sena Blood Donation Camp: रक्ततुटवड्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुंबईत रक्तदान अभियान

मुंबई : गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या सामाजिक जबाबदारीतून शिवसेना रविवारी, 22 नोव्हेंबरपासून

Hariyana Crime: बनावट सिगारेटचा मोठा साठा जप्त; सोनिपतमधील कारखान्यावर पोलिसांचा छापा

बनावट सिगारेटच्या अवैध व्यापाराविरोधात कारवाई करताना, हरियाणा येथील रोहिणी जिल्हा पोलिसांच्या अमली पदार्थ

Nashik Kumbh Mela 2027 : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 84 धार्मिक संस्थांची नोंदणी, भाविकांची सेवा करणाऱ्या संस्थांना सरकार देणार आर्थिक मदत

नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी हळूहळू वेग घेत आहे. कुंभमेळ्यासाठी

Narendra Modi statement today : आव्हानांना भिडण्याची ताकद भारतामध्ये आहे; पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन!

देशातील नागरिकांनी स्वतःच्या मनात निर्माण केलेली भीती आणि मर्यादांची चौकट मोडून बाहेर पडावे, असे आवाहन