
जनगणना 2027 च्या दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या गणनेचे काम अचूक, पारदर्शक आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने या कामास सर्वोच्च प्राधान्य द्यावे. जनगणनेच्या माध्यमातून संकलित होणारी माहिती पुढील नियोजन आणि विविध विकासकामांसाठी महत्त्वपूर्ण असल्याने सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिले. जनगणना 2027 च्या दुसऱ्या टप्प्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी प्रधान जनगणना अधिकाऱ्यांची राज्यस्तरीय परिषद 21 नोव्हेंबर रोजी सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचे उद्घाटन मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या आभासी उपस्थितीत झाले.
जनगणना 2027 चे राज्यातील वेळापत्रक
महाराष्ट्रात 10 ते 24 जानेवारी 2027 या कालावधीत नागरिकांना ऑनलाइन स्वयं-गणना पोर्टलद्वारे स्वतःची माहिती नोंदवता येणार आहे. त्यानंतर 25 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2027 या कालावधीत प्रगणक घरोघरी जाऊन लोकसंख्या गणना करतील. 28 फेब्रुवारीच्या मध्यरात्री बेघर लोकसंख्येची गणना करण्यात येईल, तर 1 ते 5 मार्च 2027 या कालावधीत पुनरावलोकन फेरी होणार आहे. या टप्प्यात नागरिकांची लोकसंख्याशास्त्रीय, सामाजिक आणि आर्थिक माहिती संकलित करण्यासाठी 40 प्रश्नांची डिजिटल प्रश्नावली वापरण्यात येणार आहे. यामध्ये नाव, कुटुंबप्रमुखाशी असलेले नाते, लिंग, वय, वैवाहिक स्थिती, धर्म, जात, दिव्यांगत्व, मातृभाषा, शिक्षण, व्यवसाय, रोजगार आणि स्थलांतर यासंबंधी माहितीचा समावेश आहे.
मुंबई : पुस्तकप्रेमी, साहित्यिक आणि वाचकांसाठी मुंबईत येत्या २४ नोव्हेंबरपासून सहा दिवसांचा पुस्तक महोत्सव रंगणार आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यास, भारत ...
परिषदेत जनगणना अधिनियम व नियम, पीई मोबाइल ॲप, एचएलबीसी आणि सीएमएमएस पोर्टल, गणना क्षेत्रांची निश्चिती, जनजागृती आणि देखरेख यासंबंधी तांत्रिक सत्रे घेण्यात आली. मास्टर ट्रेनर्स, जिल्हा व चार्ज अधिकारी आणि तांत्रिक सहाय्यकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून क्षेत्रीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण सुरू आहे. यानंतर प्रगणक आणि पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. परिषदेस नवी दिल्ली येथील भारताचे महानिबंधक कार्यालयाचे उपमहानिबंधक (सी अँड टी) जसपाल सिंग, सर्व विभागीय आयुक्त, राज्यातील प्रधान जनगणना अधिकारी, जनगणना कार्य संचालनालय, मुंबई तसेच महाराष्ट्र शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.






