
मुंबई (विशेष प्रतिनिधी): देवनार डम्पिंग ग्राऊंडवर रात्रीच्या वेळी कचऱ्याचे ढिग लावण्याचे काम हाती घेतले जात असल्यामुळे यासाठी कृत्रिम प्रकाश व्यवस्था करण्यासाठी वाहनारुढ हायमास्टचा वापर केला जातो. परंतु या हायमास्टच्या प्रकाशावर स्थायी समितीत शंका उपस्थित करण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात बायाेमायनिंगचे काम सुरु होणे आणि ऊर्जा निर्मिती प्रकल्पाचे काम पूर्ण होईपर्यंत या हायमास्टची सुविधा आवश्यक असल्याने स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली. परंतु अशाप्रकारचे हायमास्ट उपलब्ध नाही आरोपच एमएमआयचे जमीर कुरेशी यांनी केली. परंतु हे मोबाईल पध्दतीचे हायमास्ट असल्याने सदस्यांनी केलेल्या शंकांचे जरुर निरसर केले जाईल व पडताळणी तथा तपासणी करून त्यांचे पेेमेंट दिले जाईल असे आश्वासन प्रशासनाच्यावतीने देण्यात आले.
मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांचा कारभार सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर करण्यासाठी सेवा पुरवठा देणाऱ्या संस्थांची निवड ...
देवनार डम्पिंग ग्राऊंडवर मोबाईल हायमास्टची सेवा घेण्याचा प्रस्ताव मंजुरीलला आला असता जमीर कुरेशी यांनी सन 2026 पासून ही सेवा घेतली जात आहे. आठ हायमास्टचा वापर केला जातो असे इथे म्हटले आहे. पण प्रत्यक्षात ही सुविधाच तिथे नाही. त्यामुळे जीपीएस यंत्रणेसह त्यांचे फोटो दिले आहेत. तर यशवंत किल्लेदार यांनी वीज निर्मिती प्रकल्प हा डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार असेल तर याची गरज काय असा सवाल केला. तसेच बायोमायनिंगचे काम कधीपर्यंत पूर्ण होईल अशी विचारणा केली. तर डॉ सईदा खान यांनी हायमास्टच्या या कंत्राट कामांमध्ये सन 2023 रोजी दिलेल्या कामांच्या तुलनेत यासाठी निवड केलेल्या कंपनीने 800 रुपयांची वाढ केली आहे, तर त्याचवेळी निविदेत भाग घेणाऱ्या कंपनींनी केवळ 100 ते 200 रुपयांची वाढ केल्याची आकडेवारीच सांगत याची चौकशी केली जावी अशी मागणी केली.
भाजपच्या प्रिती सातम यांनी हायमास्ट केव्हापासून बसवले आहे. किती वेळा बंद पडले, किती वेळा दुरुस्त केले तसेच बंद पडल्यानंतर पर्यायी सुविधा दिली का याची माहिती मागितली. तर मिनाक्षी पाटणकर यांनी यासाठी जीएसटीचा सामावेश का केला नाही अशी विचारणा केली. वीज निर्मिती प्रकल्प कधीपर्यंत पूर्ण होणार आहे आणि यातून निर्माण होणाऱ्या विजेचा वापर कुठे केला जाणार आहे अशी विचारणा भाजपच्या शीतल गंभीर यांनी केला.
मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई ...
यावर प्रशासनाच्यावतीने अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी या हायमास्टच्या सेवांमध्ये हायमास्ट 9 मीटर उंचीचे असून दरदिवशी 12 ते 15 लिटरचा डिझेलचा वापर केला जातो तसेच मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. याठिकाणी बांधकामाचे डेब्रीज टाकले जात असून सदस्यांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नांचे निरसन व्हायला पाहिजे, त्याची पडताळणीही आवश्यक आहे. त्यामुळे पडताळणी केल्याशिवाय त्यांचे पेमेंट देवू नये याबाबत निश्चितच विचार केला जाईल असे सांगितले. त्यानुसार स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली.




