ध्रुव जुरेलचा अप्रतिम झेल
डावखुरा निकोल्स आत येणारा चेंडू लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला. पण हा चेंडू बॅटच्या आतच्या कडेला लागून थाय पॅडला लागला आणि हवेत उडला. शॉर्ट लेग उभ्या असलेल्या ध्रुव जुरेलने ही संधी साधली. पण हा चेंडू त्याच्यापासून खूपच लांब होता. त्याने क्षणाचाही विलंब न करता हवेत उडी घेतली आणि उजव्या हातात झेल पकडला. ध्रुव जुरेलने झेल घेतल्याचं पाहून निकोल्स नाराज झाला. कारण चुकीचा फटका आणि अप्रतिम झेल घेतल्याने तंबूत परण्याशिवाय पर्याय नव्हता. हा झेल पकडताना जुरेल जोरात जमिनीवर आदळल्यामुळे त्याच्या कंबरेला दुखापत झाली आणि तो काही वेळ वेदनेने विव्हळताना दिसला, मात्र त्याने चेंडू हातातून सुटू दिला नाही.
IND vs NZ: भारताने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात रचला इतिहास, 27 वर्षे जुना विक्रम मोडला
भारत न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना सुरू असून निर्णायक स्थितीत आला आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला असून न्यूझीलंडने दुसऱ्या डावात 119 धावांवर 2 ...
ध्रुव जुरेलने फलंदाजीतही दिलं योगदान
ध्रुव जुरेलला या सामन्यात मधल्या फळीत खेळण्याची संधी मिळाली. त्याने या संधीचं सोनं केलं. ध्रुव जुरेलने ऋषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदरसोबत अर्धशतकी भागीदारी केली. ध्रुव जुरेलने ऋषभ पंतसोत 84 चेंडूत 75 धावांची भागीदारी, तर वॉशिंग्टन सुंदरसोबत 59 चेंडूत 54 धावांची भागीदारी केली. ध्रुव जुरेलने 79 चेंडूत 9 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 78 धावांची खेळी केली.