ही टी 20 मालिका 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान वडोदरा आणि सुरत येथे खेळवली जाईल. जानेवारीमध्ये होणाऱ्या आयसीसी 19 वर्षांखालील महिला टी 20 विश्वचषक 2027 च्या तयारीसाठी ही मालिका महत्त्वपूर्ण ठरेल. या मालिकेची सुरुवात 26 नोव्हेंबर रोजी वडोदरा येथे पहिल्या टी 20 सामन्याने होईल, त्यानंतर दुसरा सामना 28 नोव्हेंबर रोजी त्याच ठिकाणी खेळला जाईल. दोन्ही सामने अनुक्रमे सायंकाळी सहा आणि दुपारी एक वाजता सुरू होतील.
IND vs NZ: तिसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाची 118 धावांची मजबूत आघाडी, गिलचं शतक अवघ्या 2 धावांनी हुकलं
IND vs NZ: : भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली आहे. पहिल्या डावात न्यूझीलंडने फलंदाजी ...
ही मालिका त्यानंतर सुरतला खेळली जाईल, जिथे उर्वरित सामने 1, 3 आणि 6 डिसेंबर रोजी खेळवले जातील. तिसरा आणि चौथा टी20 सामना सायंकाळी सहा वाजता सुरू होईल. तर अंतिम सामना दुपारी एक वाजता खेळला जाईल. ही मालिका युवा भारतीय संघासाठी मोठ्या स्पर्धेपूर्वी आपल्या संघरचना आजमावून पाहण्याची आणि गती मिळवण्याची एक उत्तम संधी असेल. भारतीय संघ आयसीसी 19 वर्षांखालील (Under 19 Women's Team) महिला टी 20 विश्वचषकाचा दोन वेळचा गतविजेता आहे. या संघाने 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवला आणि त्यानंतर 2025 मध्ये मलेशियात विजेतेपद कायम राखले.
संघातील प्रमुख खेळाडू
भाविका अहिरे (कर्णधार, यष्टीरक्षक), इरा जाधव, निधी महतो, पूर्वा सिवाच, मेहक नरवसे, मैत्री मणियार, ईश्वरी अवसरे, दिया यादव, श्रेया एस. चव्हाण, समायरा राघव, कुमारी पलक, उमा काशवी, अक्सा परमार, अनादी तगडे आणि पलक सिंग