ASIA CUP 2026, IND vs PAK Live Updates: उपांत्य फेरीत जागा मिळवण्यासाठी भारत पाकिस्तान यांच्यात लढत, सामन्याचे प्रत्येक अपडेट एका क्लिकवर

IND vs PAK Match Live Updates: आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत भारत पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना होणार आहे. भारत ए आणि पाकिस्तान ए संघात लढत होणार आहे. या सामन्यात विजयी संघाला उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार आहे. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे.

आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत क्रीडाप्रेमींना हायव्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले भारत आणि पाकिस्तान हे संघ भिडणार आहेत. उपांत्य फेरीत जागा मिळवण्यासाठी दोन्ही संघांना या सामन्यात विजय आवश्यक आहे. त्यामुळे या सामन्याकडे क्रीडाप्रेमींच्या नजरा लागून आहेत. भारत ए आणि पाकिस्तान ए हे दोन्ही संघ एकाच गटात आहेत. तसेच दोन्ही संघांचे प्रत्येकी 2 गुण आहेत. मात्र भारताचा नेट रनरेट पाकिस्तानच्या तुलनेत चांगला आहे.त्यामुळे गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे.
LIVE UPDATES

ASIA CUP 2026, IND vs PAK Live Updates: भारत 'ए' विरुद्ध पाकिस्तान 'ए' संघ

भारत ए संघ : वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, आयुष बडोनी, तिलक वर्मा (कर्णधार), कुमार कुशाग्रा (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, सूर्यांश शेडगे, शाहबाज अहमद, विपराज निगम, हर्षित राणा, प्रिन्स यादव, तनुष कोटियान, प्रभसिमरन सिंग, हर्षद खान, अरशद खान.

पाकिस्तान ए संघः शमिल हुसेन, माझ सदाकत, रोहेल नझीर (यष्टीरक्षक), हसन नवाज, अब्दुल समद (कर्णधार), फरहान युसूफ, साद मसूद, मोहम्मद इम्रान रंधावा, अहमद दानियाल, सुफयान मोकीम, अली रझा, शाहजेब खान, हैदर अली, मोहम्मद हसनैन, दानिश अझीझ

ASIA CUP 2026, IND vs PAK Live Updates: बांगलादेश आणि श्रीलंका यांचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित

'अ' गटातून बांगलादेश आणि श्रीलंका यांनी उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. दोघांनीही आपापले सलामीचे सामने जिंकले असून आता ते एकमेकांविरुद्ध खेळतील. हाँगकाँग आणि अफगाणिस्तान गट फेरीतून बाहेर पडले आहेत.

ASIA CUP 2026, IND vs PAK Live Updates: भारत पाकिस्तान लाईव्ह सामना कुठे पाहता येईल?

भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्याचे भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण केले जाईल. सोनी लिव्ह ॲप आणि वेबसाइटवरही थेट प्रक्षेपण (लाइव्ह स्ट्रीमिंग) उपलब्ध असेल.

ASIA CUP 2026, IND vs PAK Live Updates: भारत पाकिस्तान सामना किती वाजता आहे?

आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेतील भारत ए आणि पाकिस्तान ए यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता होईल. तर नाणेफेकीचा कौल हा दुपारी 3 वाजता होईल.

ASIA CUP 2026, IND vs PAK Live Updates: आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 मधील भारत 'ए' विरुद्ध पाकिस्तान 'अ' संघाचा आठवा सामना कधी खेळला जाईल?

आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 मधील भारत 'ए' विरुद्ध पाकिस्तान 'ए' संघाचा आठवा सामना आज म्हणजेच 22 नोव्हेंबर (रविवार) रोजी खेळला जाईल.

Comments
Add Comment

IND vs NZ कसोटी सामन्यातील चौथ्या दिवसाचा खेळ संपला, टीम इंडियासाठी उद्याचा दिवस महत्त्वाचा; कोण बाजी मारणार?

मुंबई: वेलिंग्टन स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत विरुद्ध न्युझीलंड कसोटी सामन्याचा चौथ्या दिवसाचा खेळ संपुष्टात

कसोटीत ऋषभ पंत नावाचं वादळ, दमदार शतक ठोकत गेमच फिरवला; ‘SENA’ देशात अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू

मुंबई: वेलिंग्टनमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यामध्ये चौथ्या दिवशी भारताच्या यष्टीरक्षक

इंग्लंडविरुद्ध U-19 महिला टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; भाविका अहिरेच्या हाती कर्णधारपद

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी -20 मालिकेसाठी भारतीय 19 वर्षांखालील

IND vs NZ: तिसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाची 118 धावांची मजबूत आघाडी, गिलचं शतक अवघ्या 2 धावांनी हुकलं

IND vs NZ: : भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली आहे.

IND vs NZ: केएल राहुलचं न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक शतक, अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय फलंदाज

मुंबई: वेलिंग्टनमधील बेसिन रिझर्व्ह मैदानात न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने जोरदारा

Asia Cup Rising Stars 2026: भारताने साखळी फेरीच्या पहिल्याच सामन्यात नेपाळला लोळवलं, तिलक-कुशाग्रची शतकी खेळी

रायझिंग स्टार्स आशिया कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारताने आपला विजयी ठसा उमटवला. नेपाळने नाणेफेकीचा कौल