IND vs NZ कसोटी सामन्यातील चौथ्या दिवसाचा खेळ संपला, टीम इंडियासाठी उद्याचा दिवस महत्त्वाचा; कोण बाजी मारणार?

वेलिंग्टन कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपला असून भारताने पहिल्या डावात 720 धावा करत न्यूझीलंडसमोर 352 धावांची भक्कम आघाडी उभारली आहे. दुसऱ्या डावात न्यूझीलंडने 2 बाद 119 धावा केल्या असून विजयासाठी त्यांना अजून 223 धावांची गरज आहे, तर भारताला आठ विकेट्सची प्रतीक्षा आहे. त्यामुळे सामन्याचा पाचवा आणि अंतिम दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहे.

मुंबई: वेलिंग्टन स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत विरुद्ध न्युझीलंड कसोटी सामन्याचा चौथ्या दिवसाचा खेळ संपुष्टात आला आहे. कसोटी सामन्यादरम्यान न्यूझीलंड संघाचा सध्याच्या घडीला दुसऱ्या डावात 2 गडी गमावून 119 धावांपर्यंत खेळ आहे. टीम इंडियाला हरवण्यासाठी न्युझीलंड संघाला आणखीन 233 धावांची आवश्यकता आहे. जेव्हा चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा डेव्हन कॉनवे 59 धावांवर आणि रचिन रवींद्र 27 धावांवर खेळत होते. तिसऱ्या दिवशी तत्पूर्वी, टीम इंडियाने आपली प्रभावी फलंदाजी सुरू ठेवत आपला पहिला डाव 9 गडी गमावून 720 धावांचं आवाहन टीम न्युझीलंडला दिलं आहे. टीम इंडियाने 352 धावांची आघाडी घेतली. पहिल्या डावात केएल राहुल आणि ऋषभ पंत यांनी शतके झळकावली, तर यशस्वी जैस्वाल, कर्णधार शुभमन गिल, देवदत्त पडिक्कल आणि ध्रुव जुरेल या सर्वांनी अर्धशतके केली.






चौथ्या दिवसाच्या खेळाचे पहिले सत्र भारतीय संघाच्या नावावर होते, ज्यात त्यांनी 250 धावांची आघाडी केली. कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी ऋषभ पंतने आपल्या दमदार खेळीने सर्वांचेच लक्ष वेधले. पंत आणि कंबोज यांनी सत्राच्या सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजीला सुरुवात केली, ज्यात पाचव्या विकेटसाठी दोघांमध्ये 68 धावांची भागीदारी झाली. नाईट वॉचमन म्हणून आलेला अंशुल कंबोज 38 धावांची खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर ऋषभ पंतला ध्रुव जुरेलची साथ मिळाली आणि दोघांनी धावांचा वेग कमी होऊ दिला नाही. आपले शतक पूर्ण करून ऋषभ पंत 128 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर पॅव्हेलियनमध्ये परतला. वेलिंग्टन कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाचे दुसरे सत्रही भारतीय संघाच्या नावावर होते, ज्यात ध्रुव जुरेलने आपले अर्धशतक पूर्ण करण्यासोबतच 78 धावांची शानदार खेळी केली, तर टीम इंडियाने या सत्रात 9 गडी गमावून 720 धावा करत आपला पहिला डाव घोषित केला.






टीम इंडियाने आपल्या पहिल्या डावामध्ये, न्युझीलंडने दिलेल्या आवाहनापेक्षा 352 सर्वाधिक धावा करत त्यांना पुढचे आवाहन दिले. यानंतर, न्यूझीलंडची दुसऱ्या डावात खूपच खराब सुरुवात झाली, ज्यात त्यांनी शून्य धावसंख्येवर आपली पहिली विकेट गमावली. कर्णधार टॉम लॅथमला जसप्रीत बुमराहने दुसऱ्याच चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. चौथ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात न्यूझीलंड संघाने आपल्या दुसऱ्या डावात खूपच चांगली फलंदाजी केली. पण 60 धावांवर त्यांचा दुसरा गडी बाद झाला. प्रमुख खेळाडू हेन्री निकोल्स 31 धावांवर प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर डेव्हन कॉनवेने रचिन रवींद्रसोबत तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून दिवसाचा खेळ संपेपर्यंत संघाला कोणताही धक्का बसू दिला नाही.


दरम्यान, अजूनही न्युझीलँडचा संघ भारताने घेतलेल्या आघाडीपेक्षा 233 धावांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे पाचवा दिवस हा महत्त्वाचा ठरणार आहे. टीम इंडिया आठ विकेट विजयापासून दूर आहे. तर न्युझीलंडला शेवटचा दिवस पूर्ण खेळून काढावा लागणार आहे त्यामुळे या सामन्याकडे क्रीडा प्रेमींच्या नजरा लागून आहेत.

Comments
Add Comment

कसोटीत ऋषभ पंत नावाचं वादळ, दमदार शतक ठोकत गेमच फिरवला; ‘SENA’ देशात अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू

मुंबई: वेलिंग्टनमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यामध्ये चौथ्या दिवशी भारताच्या यष्टीरक्षक

इंग्लंडविरुद्ध U-19 महिला टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; भाविका अहिरेच्या हाती कर्णधारपद

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी -20 मालिकेसाठी भारतीय 19 वर्षांखालील

IND vs NZ: तिसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाची 118 धावांची मजबूत आघाडी, गिलचं शतक अवघ्या 2 धावांनी हुकलं

IND vs NZ: : भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली आहे.

IND vs NZ: केएल राहुलचं न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक शतक, अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय फलंदाज

मुंबई: वेलिंग्टनमधील बेसिन रिझर्व्ह मैदानात न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने जोरदारा

Asia Cup Rising Stars 2026: भारताने साखळी फेरीच्या पहिल्याच सामन्यात नेपाळला लोळवलं, तिलक-कुशाग्रची शतकी खेळी

रायझिंग स्टार्स आशिया कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारताने आपला विजयी ठसा उमटवला. नेपाळने नाणेफेकीचा कौल

Rising Stars Asia Cup: वनडे फॉरमेटच्या पहिल्याच परीक्षेत अभिषेक शर्मा नापास; अवघ्या 13 चेंडूंतच डाव आटोपला!

अभिषेक शर्मा टी20 फॉरमेटमधील सर्वोत्तम फलंदाज आहे. हे त्याने आपल्या फलंदाजीने सिद्ध करून दाखवलं आहे. त्यामुळे