ऋषभ पंतने न्यूझीलंडच्याच मैदानावर मॅककुलमला टाकले मागे; वेलिंग्टनमध्ये ऐतिहासिक धमाका

भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने वेलिंग्टन कसोटीत न्यूझीलंडविरुद्ध आपले नववे कसोटी शतक साजरे केले. या खेळीत मारलेल्या सहा षटकारांमुळे पंतने माजी कीवी कर्णधार ब्रेंडन मॅककुलमला मागे टाकत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

1/6 इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या मैदानांवर आपल्या आक्रमक फलंदाजीची चुणूक दाखवणाऱ्या पंतने न्यूझीलंडमध्येही खळबळ उडवून दिली आहे. पहिल्या कसोटीत भारताने उभारलेल्या 720 धावांच्या भक्कम धावसंख्येत पंतच्या या शतकाचा मोलाचा वाटा राहिला. त्याने 10 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 128 धावांची खेळी केली. (Photo: BCCI Twitter)

2/6 वेलिंग्टन कसोटीत न्यूझीलंडविरुद्ध तुफानी फलंदाजी करत ऋषभ पंतने आपल्या कसोटी कारकिर्दीतील नववे शतक झळकावले. या झंझावाती खेळीदरम्यान सहा उत्तुंग षटकार खेचत पंतने न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू ब्रेंडन मॅककुलमला मागे टाकण्याचा पराक्रम केला आहे. (Photo: BCCI Twitter)

3/6 कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पंत आता दुसऱ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. त्याच्या खात्यात आता 108 षटकार झाले असून, त्याने ब्रँडन मॅककुलमला (107) मागे टाकले आहे. कसोटीत सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रमात आता फक्त इंग्लंडचा बेन स्टोक्स (138) पंतच्या पुढे आहे.(Photo: BCCI Twitter)

4/6 ऋषभ पंत म्हणाला की, 'मला वाटतं, ते नक्कीच एक चांगलं शतक होतं. न्यूझीलंड हे एक असं ठिकाण होतं जिथे माझं लक्ष त्या शतकावर नक्कीच होतं. आणि मी याची खात्री केली की, अशा खेळपट्टीवर जिथे तुम्हाला संघर्ष करावा लागतो आणि प्रत्येकजण चांगली फलंदाजी करत असतो, तिथे मला शक्य तितका वेळ खेळपट्टीवर टिकून राहायचं होतं आणि माझा प्रभाव पाडायचा होता.' (Photo: BCCI Twitter)

5/6 तुमच्या खेळीचा किती भाग पूर्वनियोजित असतो? या प्रश्नावर ऋषभ पंत म्हणाला की, 'मला वाटतं, मी त्याबद्दल जास्त विचार करत नाही. मी बहुतेक वेळा गोलंदाजाच्या मनाचा खेळ करण्याचा प्रयत्न करतो, पण मी बहुतेक वेळा गोष्टी सोप्या ठेवतो. जेव्हा कधी चेंडू माझ्या नजरेसमोर येतो, तेव्हा मी त्याला फटका मारण्याचा प्रयत्न करतो.' (Photo: BCCI Twitter)

6/6 शतक पूर्ण करण्यासाठी षटकार मारण्याची तुमची किती तीव्र इच्छा होती? ती एक योजना होती का? या प्रश्नावर ऋषभ पंत म्हणाला की, 'बघा, बहुतेक वेळा जेव्हा मी शतक करण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा मी ते षटकाराने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. पण त्यामुळेच, माझी बरीच शतकं हुकली आहेत. त्यामुळे मी वाट पाहत होतो, मी खूप संयम बाळगला होता. पण जेव्हा मिड-ऑफचा खेळाडू वर आला, तेव्हा मला वाटलं, हीच योग्य संधी आहे. मी ती साधू शकेन.' (Photo: BCCI Twitter)
Comments
Add Comment

Global Peace Honours 2026 : सचिन तेंडुलकर यांना ‘ग्लोबल पीस ऑनर्स 2026’ पुरस्कार; गेटवे ऑफ इंडिया येथे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सन्मान

मुंबई : भारतरत्न आणि माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना त्यांच्या सामाजिक आणि परोपकारी कार्यासाठी ‘ग्लोबल पीस

जमिनीवर आदळला, पण चेंडू सुटू दिला नाही! ध्रुव जुरेलने पकडला अप्रतिम झेल, प्रसिद्ध कृष्णाच्या खात्यात मोठी विकेट Watch Video

भारत न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना सुरू असून निर्णायक स्थितीत आहे. चौथ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा

IND vs NZ: भारताने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात रचला इतिहास, 27 वर्षे जुना विक्रम मोडला

भारत न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना सुरू असून निर्णायक स्थितीत आला आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला असून

IND vs NZ: भारताने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी केली ऐतिहासिक कामगिरी, 149 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

[caption id="attachment_1077725" align="aligncenter" width="800"] न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. वेलिंग्टन

ASIA CUP 2026, IND vs PAK Live Updates: पाकिस्तानला तिसरा धक्का, माज सदाकतची विकेट सूर्यांश शेडगेने काढली

आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत क्रीडाप्रेमींना हायव्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. पारंपरिक

IND vs NZ कसोटी सामन्यातील चौथ्या दिवसाचा खेळ संपला, टीम इंडियासाठी उद्याचा दिवस महत्त्वाचा; कोण बाजी मारणार?

मुंबई: वेलिंग्टन स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत विरुद्ध न्युझीलंड कसोटी सामन्याचा चौथ्या दिवसाचा खेळ संपुष्टात