IND vs NZ: वेलिंग्टन कसोटीत टीम इंडियाचं विजयाचं गणित कसं चुकलं? सौरव गांगुलीने उपस्थित केला प्रश्न

न्यूझीलंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना भारताच्या हातात होता. मात्र भारतीय गोलंदाजांना ही संधी काही हेरता आली नाही. सामना ड्रॉ झाल्यानंतर माजी कर्णधार सौरव गांगुली याने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. फिरकी गोलंदाजीवरून प्रश्न उपस्थित केला.

भारत न्यूझीलंड पहिला कसोटी सामना ड्रॉ झाला. या सामन्यावर खरं तर भारताची मजबूत पकड होती. मात्र गोलंदाजी हवी तशी झाली नाही आणि न्यूझीलंडचा संघ पराभव रोखण्यात यशस्वी ठरला. या निकालानंतर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने संघातील फिरकी गोलंदाजीच्या पर्यायावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. जेव्हा खेळपट्टी सपाट असते तेव्हा एका खऱ्याखुऱ्या फिरकी गोलंदाजाची गरज असते, हे सौरव गांगुलीने जोर देऊन सांगितलं. सौरव गांगुली यांनी सोशल मीडियावर याबाबत थेट प्रश्न विचारला आहे. सौरव गांगुलीने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलं की, भारतीय संघाने या मालिकेतील व्हाइट बॉल असो की आता रेड बॉल क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. सौरव गांगुली म्हणाला की, 'फलंदाजांची कामगिरी चांगली दिसली. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहीजे की देशाबाहेर कसोटी सामना जिंकण्यासाठी आणि कालांतराने सपाट होणाऱ्या खेळपट्ट्यांवर एका अस्सल फिरकी गोलंदाजाची गरज असते.'

काय म्हणाला सौरव गांगुली?


वेलिंग्टन कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भारताने 720 धावा केल्या होत्या. तसेच 352 धावांची मजबूत आघाडी घेतली होती. मात्र दुसऱ्या डावात न्यूझीलंडने 5 गडी गमवून 239 धावा केल्या आणि भारतीय गोलंदाजांना रडवलं. भारतीय गोलंदाज विकेट घेण्यासाठी घाम गाळत होते. पण एकाही गोलंदाजाला यश मिळालं नाही. असं असताना सौरव गांगुलीने भारतीय फिरकीच्या पर्यायावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. वॉशिंग्टन सुंदरकडे मुख्य फिरकी गोलंदाज पर्याय म्हणून पाहू नये, असंही सौरव गांगुली म्हणाला. त्याने फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आणि मानव सुथार यांना गैरहजेरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. सौरव गांगुलीने थेट प्रश्न विचारला की, 'वॉशिंग्टन अष्टपैलू म्हणून खेळू शकतो. कुलदीप किंवा मानव सुथार कुठे आहेत?'








पहिला कसोटी सामना ड्रॉ झाल्याने भारतीय गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. वॉशिंग्टन सुंदर फलंदाजीला नियंत्रण आणि खोली देतो. पण गांगुलीच्या मते, भारताला एक चांगल्या फिरकी गोलंदाजाची गरज असून तो विकेट घेऊ शकेल. विशेष करून जेव्हा परिस्थिती अनुकूल नसते तेव्हा.. 27 नोव्हेंबरपासून क्राइस्टचर्च येथे दुसरा कसोटी सामना होणार आहे. या सामन्यातही तशीच खेळपट्टी असण्याची शक्यता आहे. सौरव गांगुली यांनी कुलदीप यादव आणि मानथ सुथारबाबत विचारलेले प्रश्न योग्यच आहेत. कारण न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत दोघांपैकी एकही गोलंदाज नाही. ऑगस्टमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत दोघंही संघाचे भाग होते. सध्याच्या संघात वॉशिंग्टन सुंदरला रवींद्र जडेजा हा एकमेव पर्याय आहे.
Comments
Add Comment

काय झालं? तिलक वर्माची कृती आणि पंचांची चूक! पाकिस्तानी खेळाडूंचा संताप, मैदानावर थेट पंचांसोबत केला राडा Video

एसीसी पुरूष आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत भारत ए आणि पाकिस्तान ए संघात सामना पार पडला. या सामन्यात

World Chess Championship 2026: गुकेश की सिंदारोव्ह? बुद्धिबळाच्या पटावर रंगणार दोन युवा चेस मास्टर्सचा महासंग्राम!

आगामी 2026 फिडे वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपमध्ये भारताचा विद्यमान युवा विश्वविजेता डी. गुकेश आणि उझबेकिस्तानचा

न्यूझीलंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना ड्रॉ झाल्यानंतर कर्णधार शुभमन गिल संतापला, खेळपट्टीबाबत सरळ म्हणाला की...

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. खरं

WTC Points Table: वेलिंग्टन कसोटी ड्रॉ झाल्याने टीम इंडियाचा अंतिम फेरीचा मार्ग खडतर, कसं काय ते जाणून घ्या

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना ड्रॉ

Madhi Cross Country: धावपटूंसाठी पर्वणी! मढी येथे 6 तारखेला क्रॉस कंट्री स्पर्धा रंगणार

अहिल्यानगर (प्रतिनिधी): अहिल्यानगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन, अहिल्यानगर आणि शिवछत्रपती करिअर अकॅडमी पाथर्डी

IND vs NZ सामना ड्रॉ, टीम इंडियाने हातातला सामना गमावला

मुंबई: वेलिंग्टन येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळला जात असलेला पहिला कसोटी सामना अनिर्णित अर्थात ड्रॉ