Saryu-Kamala Express : अयोध्या ते जनकपुर धावणार सरयू- कमला एक्सप्रेस, 604 किमीचा प्रवास 19 तासांत, जाणून घ्या थांबे आणि वेळापत्रक

या उद्घाटन सोहळ्याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्या धाम रेल्वे स्थानकावर उपस्थित होते.

Saryu-Kamala Express : भारत आणि नेपाळमधील धार्मिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने अयोध्या धाम ते जनकपुर धामदरम्यान नवीन रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सरयू-कमला एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. या उद्घाटन सोहळ्याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्या धाम रेल्वे स्थानकावर उपस्थित होते. ( Saryu-Kamala Express)






भगवान श्रीरामांचे जन्मस्थान असलेल्या अयोध्या आणि माता सीतेचे जन्मस्थान मानल्या जाणाऱ्या जनकपूरला जोडणारी ही ट्रेन भाविक आणि पर्यटकांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. या रेल्वेमुळे दोन्ही देशांतील प्रवाशांना धार्मिक स्थळांपर्यंत पोहोचणे अधिक सोयीचे होईल.





सरयू-कमला एक्सप्रेस कुठे थांबणार?


सरयू-कमला एक्सप्रेस आठवड्यातून एकदा धावणार आहे. अयोध्या धाम ते जनकपूर धामदरम्यानचे सुमारे 604 किलोमीटरचे अंतर ही ट्रेन 19 तासांत पूर्ण करेल. प्रवासादरम्यान उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर या ट्रेनला थांबा देण्यात आला आहे.


या ट्रेनचे प्रमुख थांबे पुढीलप्रमाणे आहेत:




  • मानकापुर

  • बस्ती

  • गोरखपुर

  • नरकटियागंज

  • रक्सौल

  • सीतामढी

  • शिशो हॉल्ट

  • मधुबनी

  • जयनगर


सरयू-कमला एक्सप्रेसचे वेळापत्रक


गाडी क्रमांक 15595 जनकपुर धाम ते अयोध्या धामदरम्यान धावेल. ही ट्रेन 28 नोव्हेंबरपासून दर शनिवारी दुपारी 1:10 वाजता (नेपाळी प्रमाणवेळेनुसार) जनकपुर धाम येथून सुटेल आणि रविवारी सकाळी 8:10 वाजता अयोध्या धामला पोहोचेल.


परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक 15596 अयोध्या धाम ते जनकपुर धामदरम्यान धावेल. ही ट्रेन 30 नोव्हेंबरपासून दर सोमवारी सायंकाळी 5:50 वाजता अयोध्या धाम येथून सुटेल आणि मंगळवारी दुपारी 12:40 वाजता (नेपाळी प्रमाणवेळेनुसार) जनकपूर धामला पोहोचेल.



ट्रेनमध्ये 17 डबे; एसी आणि स्लीपरची सुविधा


सरयू-कमला एक्सप्रेसमध्ये एकूण 17 डबे असतील. यामध्ये 8 एसी आणि 7 स्लीपर डब्यांचा समावेश आहे. तसेच दिव्यांग प्रवाशांसाठी 1 पॉवर कार आणि 1 एसएलआरडी डबा असेल.


अयोध्या आणि जनकपुर या रामायण परंपरेशी संबंधित दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणारी ही रेल्वे सेवा भारत-नेपाळमधील सांस्कृतिक संबंधांना नवी दिशा देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Comments
Add Comment

UP Vidhan Sabha election strategy : यूपी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा 'मास्टरप्लॅन' तयार! आमदार, खासदारांवर सोपवली मोठी जबाबदारी

लखनऊ : उत्तर प्रदेशात होणाऱ्या पुढच्या विधानसभा निवडणुकीची तयारी भारतीय जनता पक्षाने आतापासूनच जोरदार सुरू

Himachal Pradesh royal wedding : जर्मनीत जुळलं प्रेम, हिमाचलमध्ये रंगला शाही विवाह! इंग्लंडच्या वऱ्हाडाला पाहून मंडीचे गावकरी थक्क

मंडी : प्रेमाला भूगोलाच्या रेषा, भाषेचे अडथळे किंवा संस्कृतीच्या भिंती रोखू शकत नाहीत, याचा प्रत्यय हिमाचल

पाण्याच्या गुणवत्तेवरील आरोपांवर 'बिसलेरी' कंपनीकडून स्पष्टीकरण, म्हणाले...

मुंबई: FSSAI ने बाटली बंद पिण्याच्या पाण्याची असलेल्या 'बिसलेरी' कंपनीच्या विरोधात खटला चालवण्यासाठी मंजुरी

HPV Vaccination : देशात एचपीव्ही लसीकरणाचा 1 कोटींचा टप्पा पूर्ण ! सहा राज्यांची 100 टक्के कामगिरी, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अभियानाचे कौतुक

HPV Vaccination : देशातील मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण यश समोर आले आहे. देशभरात सुरू असलेल्या राष्ट्रीय

PUC Validity Check: गाडीचा PUC संपलाय का? मोबाईलवर एका क्लिकमध्ये घरबसल्या तपासा

PUC Validity Check: जर तुम्ही कार किंवा बाईक चालवत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आता तुम्ही घरबसल्या तुमच्या फोनच्या

आईच्या निधनानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यना भावूक, शेअर केले भावनिक पत्र

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मातोश्री सावित्री देवी यांचे दोन