Tuesday, November 24, 2026

Railway News : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! नगरसोल-तारूर मार्गावर 16 दिवसांचा ब्लॉक; अनेक गाड्या रद्द

तर काही गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या असून, काहींच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे.

">तपासूनच प्रवासाला निघावे. कोणत्या गाड्या रद्द झाल्या आहेत आणि कोणत्या गाड्यांवर परिणाम होणार आहे, जाणून घ्या.

या पॅसेंजर गाड्या पूर्णपणे रद्द

  • रेल्वे क्रमांक 77619 जालना–नगरसोल पॅसेंजर : 1, 3, 7, 8 आणि 10 डिसेंबर रोजी रद्द.
  • रेल्वे क्रमांक 77620 नगरसोल–जालना पॅसेंजर : 1, 3, 7, 8 आणि 10 डिसेंबर रोजी रद्द.
  • रेल्वे क्रमांक 77621 जालना–नगरसोल डेमू : 2, 4, 5, 6 आणि 9 डिसेंबर रोजी रद्द.
  • रेल्वे क्रमांक 77622 नगरसोल–जालना डेमू : 2, 4, 5, 6 आणि 9 डिसेंबर रोजी रद्द.

या एक्स्प्रेस आणि पॅसेंजर गाड्या अंशतः रद्द

काही गाड्या त्यांच्या नियोजित मार्गावर पूर्णपणे धावणार नसून, नगरसोल–रोटेगाव किंवा रोटेगाव–नगरसोलदरम्यान त्यांच्या फेऱ्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत.

  • रेल्वे क्रमांक 16003 चेन्नई–नगरसोल एक्स्प्रेस : 6 डिसेंबर रोजी रोटेगाव–नगरसोलदरम्यान अंशतः रद्द.
  • रेल्वे क्रमांक 16004 नगरसोल–चेन्नई एक्स्प्रेस : 8 डिसेंबर रोजी नगरसोल–रोटेगावदरम्यान अंशतः रद्द.
  • रेल्वे क्रमांक 17231 नरसापूर–नगरसोल एक्स्प्रेस : 4 आणि 6 डिसेंबर रोजी रोटेगाव–नगरसोलदरम्यान अंशतः रद्द.
  • रेल्वे क्रमांक 17232 नगरसोल–नरसापूर एक्स्प्रेस : 5 आणि 7 डिसेंबर रोजी नगरसोल–रोटेगावदरम्यान अंशतः रद्द.
  • रेल्वे क्रमांक 12787 नरसापूर–नगरसोल एक्स्प्रेस : 30 नोव्हेंबर तसेच 1, 2, 3, 5, 7, 8 आणि 9 डिसेंबर रोजी रोटेगाव–नगरसोलदरम्यान अंशतः रद्द.
  • रेल्वे क्रमांक 12788 नगरसोल–नरसापूर एक्स्प्रेस : 1, 2, 3, 4, 6, 8, 9 आणि 10 डिसेंबर रोजी नगरसोल–रोटेगावदरम्यान अंशतः रद्द.
  • रेल्वे क्रमांक 16867 मनमाड–धर्माबाद एक्स्प्रेस : 1 ते 10 डिसेंबरदरम्यान मनमाड–लासूरदरम्यान अंशतः रद्द.
  • रेल्वे क्रमांक 17688 धर्माबाद–मनमाड एक्स्प्रेस : 1 ते 10 डिसेंबरदरम्यान लासूर–मनमाडदरम्यान अंशतः रद्द.
  • रेल्वे क्रमांक 57652 मनमाड–नांदेड पॅसेंजर : 9 आणि 10 डिसेंबर रोजी मनमाड–लासूरदरम्यान अंशतः रद्द.
  • रेल्वे क्रमांक 57651 नांदेड–मनमाड पॅसेंजर : 8 आणि 9 डिसेंबर रोजी लासूर–मनमाडदरम्यान अंशतः रद्द.
  • रेल्वे क्रमांक 17661 काचीगुडा–नगरसोल एक्स्प्रेस : 3 ते 9 डिसेंबरदरम्यान रोटेगाव–नगरसोलदरम्यान अंशतः रद्द.
  • रेल्वे क्रमांक 17662 नगरसोल–काचीगुडा एक्स्प्रेस : 4 ते 10 डिसेंबरदरम्यान नगरसोल–रोटेगावदरम्यान अंशतः रद्द.

या गाड्या उशिराने धावणार

रेल्वे ब्लॉकमुळे काही गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे.

  • रेल्वे क्रमांक 12753 नांदेड–निझामुद्दीन एक्स्प्रेस : 1 आणि 8 डिसेंबर रोजी 80 मिनिटे उशिराने धावणार.
  • रेल्वे क्रमांक 12715 नांदेड–अमृतसर एक्स्प्रेस : 1 ते 10 डिसेंबरदरम्यान 70 मिनिटे उशिराने धावणार.
  • रेल्वे क्रमांक 17618 नांदेड–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस : 1 ते 10 डिसेंबरदरम्यान 70 मिनिटे उशिराने धावणार.

रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणामुळे भविष्यात रेल्वे वाहतुकीची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. मात्र, काम सुरू असलेल्या 16 दिवसांत प्रवाशांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी रेल्वेचे अधिकृत वेळापत्रक आणि गाडीची स्थिती तपासावी.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >