Diljit Dosanjh: दिलजीत दोसांझच्या बंगळुरू कॉन्सर्टला बॉम्बस्फोटाची धमकी; मेट्रो स्थानकांनाही लक्ष्य करण्याचा इशारा

बंगळुरूमध्ये २९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पंजाबी गायक दिलजीत दोसांझ यांच्या कॉन्सर्टच्या ठिकाणी आणि शहरातील मेट्रो स्थानकांवर स्फोट घडवण्याची धमकी देणारा ईमेल प्राप्त झाला आहे.

कर्नाटक येथील हुबळी-धारवाड महानगरपालिकेला मंगळवारी (२४ नोव्हेंबर) एक ईमेल प्राप्त झाला, ज्यामध्ये २९ नोव्हेंबर रोजी बेंगळुरू येथे होणाऱ्या गायक दिलजित दोसांज यांच्या कॉन्सर्टच्या ठिकाणी, तसेच शहरातील विविध मेट्रो स्थानकांवर स्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली आहे. या घटनेनंतर संबंधित ठिकाणी शोधमोहीम राबवण्याचे आदेश देण्यात आले आणि याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला. मात्र, शोधमोहिमेदरम्यान काहीही संशयास्पद आढळले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ९ नोव्हेंबर रोजी महापालिका आयुक्तांना पाठवलेल्या ईमेलमध्ये, पंजाबी गायक त्याच्या 'ऑरा इंडिया टूर'चा भाग म्हणून ज्या नाईस ग्राउंडवर कार्यक्रम सादर करणार आहे, तिथे स्फोटक उपकरण हल्ल्याचा इशारा देण्यात आला होता. त्यात २९ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.११ ते रात्री ११.११ या वेळेचा उल्लेख होता आणि लोकांना त्या दिवशी कार्यक्रमाच्या ठिकाणी न जाण्याचा किंवा मेट्रोचा वापर न करण्याचा सल्ला देण्यात आला होता. या संदेशात २७ नोव्हेंबर रोजी मुंबईतील अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या निवासस्थानाजवळ स्फोट घडवण्याची धमकीही देण्यात आली होती.


हुबळी धारवाडचे पोलीस आयुक्त भूषण बोरासे यांनी सांगितले की, बॉम्ब शोधक आणि निकामी पथकासह पोलीस कर्मचाऱ्यांनी महानगरपालिकेच्या परिसराची तपासणी केली. धमकीच्या ईमेलनंतर झालेल्या पोलीस कारवाईला दुजोरा देताना सायबर गुन्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ईमेलमध्ये खलिस्तान समर्थक घोषणा होत्या आणि त्यात खलिस्तान नॅशनल आर्मी आणि बंदी घातलेली संघटना बब्बर खालसा यांचा उल्लेख होता, असे पोलिसांनी सांगितले.






बेळगावी शहर महापालिकेलाही अशीच धमकी मिळाली होती. पोलिसांनी त्यांच्या परिसराची तपासणी केली, परंतु त्यांना कोणतेही स्फोटक आढळले नाही. दोन महानगरपालिका कार्यालयांमधील शोधमोहिमेदरम्यान बॉम्ब निकामी करणारे कर्मचारी आणि श्वानपथके तैनात करण्यात आली होती. हा ईमेल कोणी पाठवले याचा तपास सायबर गुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बंगळुरू येथील त्यांच्या समकक्ष अधिकाऱ्यांना पत्राबद्दल माहिती देण्यात आली आहे. या तक्रारीच्या आधारे बंगळुरूच्या नॉर्थ सीएन पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल केला आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.

Comments
Add Comment

Shahid Kapoor : शाहिद कपूरने खरेदी केली नवी Land Rover Defender OCTA कार; किंमत 3 कोटी रुपये

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर पुन्हा एकदा आपल्या लक्झरी कारच्या खरेदीमुळे चर्चेत आला आहे. त्याने नुकतीच Land Rover

IMDb Trending: रावणापेक्षाही कुंभकर्णाची चर्चा! IMDb च्या यादीत फैसल मलिक अव्वल

भारतीय चित्रपटसृष्टीत सध्या दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू

Panchayat 5 चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, रिंकु आणि सचिवची लव्हस्टोरी बहरणार; 'फुलेरा'तील स्थानिक राजकारण बदलणार

मुंबई: बहुप्रतिक्षित 'पंचायत'च्या पाचव्या सीझनचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. येत्या 3 डिसेंबर 2026 रोजी,

Parastoo Ahmadi 74 lashes: प्रसिद्ध इराणी गायिकेला 74 चाबकाचे फटके, हिजाब न घालता गाणं गायल्यामुळे देण्यात आली शिक्षा

मुंबई: इराणमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि महिलांच्या स्वातंत्र्यावरून पुन्हा एकदा मोठा वाद उफाळून आला आहे.

Shraddha kapoor Shreya Ghoshal viral video : श्रेया घोषालच्या बंगळुरू कॉन्सर्टमध्ये श्रद्धा कपूरची खास हजेरी; 'आशिकी २'पासून 'ईठा'पर्यंतच्या आठवणींना उजाळा

मुंबई : सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) हिच्या बंगळुरू येथील लाईव्ह कार्यक्रमात अभिनेत्री श्रद्धा कपूर

Pratap Movie: 'स्वतःची ओळख कधीही गमावू नका'; ईशा देओलचा तरुणांना संदेश

मुंबई: आगामी 'प्रताप' चित्रपटाच्या प्रोमोशन निमित्ताने अभिनेत्री ईशा देओल, अभिनेता अमित साध आणि चित्रपट