
मुंबई: चिप निर्मिती करणाऱ्या एनव्हीडिया (NVIDIA) या दिग्गज कंपनीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींना अखेर आता पुर्णविराम मिळालेला आहे. अखेर काल एनव्हीडिया कंपनीला मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. जेन्सन हुआंग यांची पुन्हा एकदा कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने (बोर्ड) घेतलेला सुरुवातीचा निर्णय बदलण्यास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट हस्तक्षेप केल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे जागतिक आणि शेअर बाजारात मोठी खळबळ उडाली असून कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली.
जगातील सर्वात मोठ्या एआय चिप कंपन्यांपैकी एक असलेल्या एनव्हीडिया कंपनीचे संस्थापक जेन्सन हुआंग यांनी सीईओ पदावर पुनरागमन केले आहे. १२ नोव्हेंबर ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सूचनेनुसार, उपराष्ट्रपती जेडी व्हॅन्स यांनी पडद्यामागे राहून जेन्सन हुआंग आणि एनव्हीडियाच्या बोर्ड सदस्यांसोबत गुप्त बैठका घेतल्या. या चर्चांमध्ये ट्रम्प प्रशासनाने कंपनीला स्पष्ट आश्वासन दिले की, जेन्सन हुआंग यांच्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला कोणताही धोका नाही आणि त्यांच्याविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नाही. या भक्कम पाठिंब्यानंतरच बोर्डाने आपला आधीचा निर्णय मागे घेतल्याचे सांगितले जाते. याआधी एलिस हुआंग नावाच्या एका चिनी महिलेशी संबंध असल्याचे कबूल केल्यानंतर जेन्सन हुआंग यांना एनव्हीडियाच्या CEO पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. संबंधित महिलेचे चिनी गुप्तचर यंत्रणेशी संबंध असल्याचा संशय अमेरिकन अधिकाऱ्यांना व्यक्त केला जात होता. त्यामुळे या प्रकरणाला राष्ट्रीय सुरक्षेचा रंग आला होता आणि कंपनीवर मोठा दबाव निर्माण झाला होता.
रात्री जर तुम्ही तुमची कार बेसमेंटमध्ये पार्क केली आणि वर तुमच्या अपार्टमेंटमध्ये गेलात, आणि तुम्हाला तुमची कार रात्रभर पार्किंगची जागा शोधताना ...
जेन्सन हुआंग यांना पाठिंबा देण्यापूर्वी आपण ॲटर्नी जनरल टॉड ब्लँच आणि गुप्तचर प्रमुख जे क्लेटन यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सल्लामसलत केल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले. चीनमध्ये चिप तस्करीच्या प्रकारात जेन्सन हुआंग यांचा कोणताही थेट सहभाग नसल्याचेही ट्रम्प यांनी नमूद केले. एनव्हीडिया ही कंपनी अमेरिकेच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे ते मानतात. मात्र, या निर्णयामुळे चीनला होणारी चिप विक्री आणि निर्यात नियंत्रणांवरून प्रशासनात काही मतभेद असल्याचेही बोलले जात आहे. जेन्सन हुआंग यांच्या पुनरागमनाचे स्वागत करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट लिहून म्हटले की, बोर्डाने त्यांना पुन्हा CEO पदावर आणण्याचा योग्य निर्णय घेतला आहे. केवळ कंपनीच्याच नव्हे, तर अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी हुआंग यांचे नेतृत्व गरजेचे आहे. त्यांच्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला कोणताही धोका मानण्याचे कारण नाही आणि कोणत्याही बेकायदेशीर कृतीत ते सहभागी असल्याचा पुरावा नसल्याचे ॲटर्नी जनरल यांनी स्पष्ट केल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. तसेच, निर्यात नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी कंपनीने अंतर्गत तपास सुरू ठेवावा, असा सल्लाही त्यांनी दिला.




