
मुंबई: मुंबईतील कुर्ल्यातील महाजन उद्यानामध्ये एका जोडप्याला अल्पवयीन टोळक्यांकडून मारहाण झाल्याचा प्रकार घडला होता. संबंधित प्रकरण शुक्रवारी (20 नोव्हेंबर) सायंकाळी घडलं होतं. कुर्ला पश्चिमेतील फिनिक्स मार्केटसिटी मॉलच्या पाठीमागच्या बाजूला असलेल्या महाजन उद्यानामध्ये बसलेल्या जोडप्याला काही अल्पवयीन टोळक्यांकडून मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. दरम्यान, आता महाजन उद्यानामध्ये अल्पवयीन टोळक्याकडून जोडप्याला झालेल्या मारहाणीची दखल महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने घेतली आहे. संबंधित प्रकरणावर येत्या 14 डिसेंबर रोजी सुनावणी करण्यात येणार आहे.
कुर्ला येथील एका बागेत किशोरवयीन जोडप्याला मारहाण केल्याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी आठ मुलांना ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी (२० नोव्हेंबर) संध्याकाळी ...
गार्डनमध्ये, बसलेल्या एका जोडप्याला अल्पवयीन टोळक्याच्या घोळक्याने घेरले. त्यांनंतर त्यांना शिविगाळ करत त्यांना हॉकीस्टीकने मारहाण सुद्धा केली. त्या जोडप्याने अल्पवयीन मुलांच्या टोळक्यांना बराचवेळ समजवण्याचा प्रयत्न सुद्धा केला. प्रयत्न करूनही त्या टोळक्याने जोडप्याला हॉकीस्टीकने मारहाण केली. त्यानंतर त्यांना गार्डनमधून हाकलून सुद्धा दिले. व्हिडिओनुसार, 8 ते 10 जणांच्या टोळक्याने त्या जोडप्याला घेरून बेल्ट, काठ्या आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तरुणाने हल्लेखोरांना विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून मारहाण सुरूच राहिली. यावेळी तरुणीलाही मारहाण करण्यात आली. तिच्यावर काठी आणि बुक्क्यांनी हल्ला करण्यात आला, तसेच जोडप्याच्या दिशेने दगड फेकल्याचेही व्हिडीओमध्ये दिसत आहे. घडलेला सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद सुद्धा झाली आहे.
मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. सुमारे 200 कोटी रुपयांच्या कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जुहू परिसरात राहणाऱ्या धर्मेंद्र सिंह याच्याविरोधात ...
दरम्यान, महाजन उद्यानामध्ये अल्पवयीन टोळक्याकडून जोडप्याला झालेल्या मारहाणीची दखल महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने घेतली आहे. आयोगाने मुंबई महापालिका आयुक्त आणि मुंबई पोलिस आयुक्त यांना नोटीस बजावली असून या संबंधित प्रकरणाची येत्या 14 डिसेंबर रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे. आयोगाने सुनावणीदरम्यान, महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांनी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणी तीन आठवड्यांच्या आत सविस्तर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर यांनी हे 'सुमोटो' प्रकरण दाखल करून घेतले आहे. अल्पवयीन मुलांकडून सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारची हिंसक कृती घडल्याने नागरिकांमध्ये चिंता आणि संताप व्यक्त केला जात आहे. या जोडप्यावर हल्ला करण्यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. या चौकशीतून हे कारण सुद्धा समोर येईल.
मुंबई : कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) जुहू येथील रहिवासी धर्मेंद्र सिंग याला अटक ...
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोडप्याला मारहाण करणाऱ्या आठ अल्पवयीन मुलांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 189(2) (बेकायदेशीर जमावाचा सदस्य असणे), 189(4) (घातक शस्त्र बाळगून बेकायदेशीर जमावाचा सदस्य असणे), 118(1) (घातक शस्त्रे किंवा साधनांचा वापर करून स्वेच्छेने दुखापत करणे), 352 (सार्वजनिक शांतता भंग करण्यास प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने हेतुपुरस्सर अपमान करणे) आणि 351 (2) (मूलभूत गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोडप्यामध्ये आणि अल्पवयीन मुलांमध्ये पूर्वी काही वाद होता का? हे निश्चित करण्यासाठी पोलीस त्या जोडप्याचे आणि मुलांचे जबाब नोंदवत आहेत. तसेच पोलिसांनी मुलांच्या पालकांना नोटीस पाठवली असून हल्ल्याचे कारण काय होते याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. शहरातील एका सार्वजनिक उद्यानात भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे.





