
मुंबई : अंगणवाडीतील बालकांचे पोषण, आरोग्य आणि शिक्षणासाठी अविरत कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दरमहा देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषात सुधारणा करण्यात आल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांच्या कामांना गती देण्यासाठी राज्य सरकारने कामगिरीवर आधारित प्रोत्साहन भत्ता योजनेत सुधारणा केली आहे. राज्यात एकूण 1,10,664 अंगणवाड्या असून 1,08,627 अंगणवाडी सेविका आणि 1,05,470 अंगणवाडी मदतनीस कार्यरत आहेत. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे गुणात्मक मूल्यमापन करून पात्र ठरणाऱ्याना दरमहा प्रोत्साहन भत्ता दिला जातो. या भत्त्याच्या निकषांमध्ये सर्वसमावेशकता, सुसूत्रता यावी तसेच अधिकाधिक सेविका आणि मदतनीस यासाठी पात्र ठराव्यात यासाठी निकषांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेतील समितीने घेतला आहे.
मुंबई : शहरीकरण ही समस्या नसून आर्थिक आणि सामाजिक विकासाची मोठी संधी आहे. देशाच्या एकूण जीडीपीमध्ये शहरांचा वाटा सुमारे ६५ टक्के असून, शहरे ही आर्थिक ...
अंगणवाडी केंद्रांच्या मूल्यमापनात समुदाय आधारित कार्यक्रम, घरपोच पोषण आहार, बालकांचे पूर्वशालेय शिक्षण, गरम ताजा आहार, आरोग्य दिवस, सकाळचा नाश्ता, अंगणवाडी केंद्राचे दैनंदिन कामकाज, बालकांचे वजन व उंचीची नोंद तसेच गृहभेटी या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व बाबींची पडताळणी पोषण ट्रॅकर ॲपवरील नोंदींच्या आधारे दरमहा केली जाणार आहे.
मंत्री आदिती तटकरे काय म्हणाल्या?
राज्याच्या शहरी आणि अतीदुर्गम भागातही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत आहेत. अधिकाधिक सेविका आणि मदतनीस भत्त्यासाठी पात्र ठरून त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी निकषात सुधारणा करण्यात आल्या आहेत.




