Wednesday, November 25, 2026

Pune Shivajinagar Court Firing : चार दिवसांपूर्वी जामीन, आज कोर्टाबाहेर हत्या! पुण्यात गोळीबाराने खळबळ

पुण्यात शिवाजी नगर परिसरात कोर्टाबाहेर भरदिवसा गोळीबाराची घडना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कोर्टाबाहेर गोळीबारासोबतच एकावर कोयत्यानेही हल्ला करण्यात आला. शिवाजीनगर कोर्टाबाहेरील परिसरात गेट नंबर 4 वर ही घटना घडली आहे.

Pune Shivajinagar Court Firing : पुण्यात शिवाजी नगर परिसरात कोर्टाबाहेर भरदिवसा गोळीबाराची घडना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कोर्टाबाहेर गोळीबारासोबतच एकावर कोयत्यानेही हल्ला करण्यात आला. शिवाजीनगर कोर्टाबाहेरील परिसरात गेट नंबर 4 वर ही घटना घडली आहे. तीन- चार जणांच्या या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला. हल्लेखोर बंदूक फेकून तेथून फरार झाले आहेत. पोलिसांनी या घटनेनंतर परिसर सील केला आहे.मृत झालेल्या व्यक्तीचे नाव मंदार किवळे असून त्याची काही दिवसांपूर्वीच जामीनावरून सुटका झाली होती.

ज्या हत्या प्रकरणात मंदार किवळे हा जामिनावर बाहेर आला होता, त्याच प्रकरणाशी त्याचे धागेदोरे जोडले गेले असल्याचे सांगितले जात आहे. कात्रज येथील संतोषनगर परिसरात जागेच्या वादातून शुभम सुभाष चव्हाण या तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणात आंबेगाव पोलिसांनी सराईत गुन्हेगार अमर दिलीप साकोरे (वय 40) याच्यासह मंदार मारुती किवळे (वय 35), गिरीश सुभाष बाबरे (वय 25) आणि योगेश बाबुराव ढोरे (वय 35) या चौघांना अटक केली होती. या घटनेची पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत शुभम चव्हाण आणि मुख्य आरोपी अमर साकोरे यांच्यात एका जागेवरून वाद सुरू होता. हत्येच्या दिवशी पहाटे शुभम कात्रजमधील संतोषनगर भागातून निघाला होता. त्यावेळी अमर साकोरे आणि मंदार किवळेसह त्याच्या इतर साथीदारांनी शुभमला अडवून शिवीगाळ व मारहाण सुरू केली. त्यावेळी आरोपींच्या तावडीतून वाचण्यासाठी शुभम पळाला असता, आरोपींनी त्याचा पाठलाग केला. त्यावेळी त्याला बांबूने बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आला होता.

या खूनानंतर आंबेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक शरद झिने यांच्या पथकाने मंदार किवळेसह चौघा आरोपींना अटक केली होती. गुप्त माहितीच्या आधारे कामठी बु. येथे छापा टाकून त्यांना अटक करण्यात आली होती. अलीकडेच 4 दिवसांपूर्वी मंदार किवळे जामिनावर बाहेर आला होता. त्यामुळे आता शिवाजीनगर कोर्टाबाहेर झालेल्या हल्ल्यात मंदारचा गेम झाल्याचे बोलले जात आहे, हा हल्ला जुन्या वैमनस्यातून आणि बदल्याच्या भावनेतूनच झाला असावा, या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, पुणे पोलिसांनी दोन आरोपींची ओळख पटवली असून तपासासाठी पथके रवाना केली आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >