Wednesday, November 25, 2026

प्रदर्शनाआधीच आयुष्मानच्या चित्रपटाची कमाई 1 कोटींच्या पार; ॲडव्हान्स बुकिंगला प्रतिसाद

'ये प्रेम मोल लिया' हा चित्रपट २७ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली असून, प्रदर्शनापूर्वीच ४,८१० शोमधून ३७,७५० तिकिटांची विक्री झाली आहे.

सुरज बडजात्या यांचा 'ये प्रेम मोल लिया' हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट २७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार असून यामध्ये आयुष्मान खुराना आणि शर्वरी वाघ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत, चित्रपटासाठी ॲडव्हान्स बुकिंगलाही सुरुवात झाली आहे. चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग २४ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा सुरू झाली. पहिल्या आठवड्यासाठी ४,८१० शोमधून ३७,७५० तिकिटे विकली गेली आहेत. यासह चित्रपटाने एकही जागा आरक्षित न करता १.०३ कोटी रुपये कमावले आहेत. पहिल्या दिवसाच्या कमाईमध्ये ३.७१८ दशलक्ष रुपये विक्रीचा समावेश आहे. तिकीटाची सरासरी किंमत २७५ रुपये इतकी आहे.

चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच महाराष्ट्र आणि दिल्ली एनसीआरमध्ये २० लाख रुपयांपेक्षा जास्त, तर राजस्थानमध्ये १४.५ लाख रुपयांची कमाई केली. तसेच गुजरात आणि तामिळनाडूमध्ये ७ लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई केली. पंजाबमध्ये ५ लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई केली. हा चित्रपट एक कौटुंबिक ड्रामा असून यात आयुष्मान खुराना आणि शर्वरी वाघ यांच्यातील प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. चित्रपटाचा कालावधी २ तास ५३ मिनिटे आहे. यशराज फिल्म्स या चित्रपटाचे वितरण करत आहे. शर्वरी वाघ आणि आयुष्मान यांच्या व्यतिरिक्त या चित्रपटात सुप्रिया पाठक, सीमा पाहवा, श्रुती सेठ आणि अनुपम खेर यांच्याही भूमिका आहेत.

चित्रपटाची कथा

चित्रपटाला संगीत हिमेश रेशमिया यांनी दिले आहे. चाहते आधीच चित्रपटाबद्दल उत्सुक आहेत आणि ट्रेलरला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ट्रेलरमध्ये आयुष्मान शरमारीच्या प्रेमात पडतो असे दाखवले आहे. शर्वरी त्याच्या प्रेमाला प्रतिसाद देते पण त्याच्याशी लग्न करण्यास नकार देते. कारण तिचे घर स्त्रियांनी भरलेले आहे , ती तिचे घर सोडून जाऊ शकत नाही. म्हणून आयुष्मान आपल्या कुटुंबाला समजावून सांगतो आणि तिच्याशी लग्न करण्यासाठी आपल्या कुटुंबासह शर्वरीच्या घरी राहायला जातो.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >