Wednesday, November 25, 2026

Pune Shivajinagar Court Firing : पुण्यात शिवाजी नगर येथे भरदिवसा गोळीबाराची घटना; गोळीबारानंतर कोयत्याने एकावर हल्ला

पुण्यात शिवाजी नगर येथे कोर्टाबाहेर भरदिवसा गोळीबाराची घडना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोर्टाबाहेर गोळीबार करत एकावर कोयत्यानेही हल्ला करण्यात आला आहे.

Pune Shivajinagar Court Firing : पुण्यात शिवाजी नगर येथे कोर्टाबाहेर भरदिवसा गोळीबाराची घडना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोर्टाबाहेर गोळीबार करत एकावर कोयत्यानेही हल्ला करण्यात आला आहे. शिवाजीनगर कोर्टाबाहेरील परिसरात गेट नंबर 4 वर ही घटना घडली आहे. तीन- चार जणांच्या या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. बंदूक फेकून हल्लेखोर फरार झाले आहेत. दरम्यान, या घटनेत एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली असून प्रकृती अत्यंत अत्यवस्थेत आहे. पोलिसांनी या घटनेनंतर परिसर सील केला आहे.

कोयत्याने हल्ला करत दोन्ही हात छाटले

सदर घटनेनंतर वरिष्ठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोरांनी गोळीबार केल्यानंतर एका व्यक्तीवर कोयत्याने वार केला आहे. मात्र, या हल्ल्यात संबंधित व्यक्तीचे दोन्ही हात छाटले गेले आहेत, असे प्राथमिक माहितीमध्ये समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वीच पुणे न्यायालयाला उडवून देण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर आता न्यायालयाच्या दारातच हत्या झाल्याने पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे.

यावेळी प्रत्यक्षदर्शीने, पूर्ण लोड मॅगझिन घटनास्थळावर पडलेली पाहिली असून, आम्ही वर कोर्टात होतो दुसऱ्या मजल्यावर, तेथून खिडकीजवळ आलो, तिथे दिसलं की एका इसमाच्या मागे पळत आहेत आणि गोळीबार सुरू आहे, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. तसेच पुढे बोलताना, तोफखाना चौकटीत पळत जातं दिसल. पुणे शहराची गुन्हेगारी टॉप लेव्हलला गेली आहे. कोर्ट संरक्षणासाठी पोलीस तेथे होते त्यामुळे तातडीनं ते घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमी व्यक्तीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. ती व्यक्ती कोण होती ते समजू शकलं नाही. परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेर झालेल्या गोळीबारातील 2 पिस्टल फेकत आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. मृत व्यक्ती एका हत्येच्या प्रकरणात साक्षीदार असल्याची माहिती समोर आली बातमी अपडेट होत आहे...
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >