मुंबईत भारत-सायप्रस सागरी व्यवसाय मंच; जहाज बांधणी, हरित नौवहनात सहकार्यावर भर

सायप्रस प्रजासत्ताकाच्या नौवहन उपमंत्री मरीना हाजीमानोलिस यांच्या भारताच्या अधिकृत दौऱ्याचा एक भाग म्हणून आज मुंबईत भारत–सायप्रस सागरी व्यवसाय मंचाचे आयोजन करण्यात आले.

सायप्रस प्रजासत्ताकाच्या नौवहन उपमंत्री मरीना हाजीमानोलिस यांच्या भारत दौऱ्याच्या निमित्ताने आज मुंबईत भारत-सायप्रस सागरी व्यवसाय मंचाचे आयोजन करण्यात आले. या मंचाला हाजीमानोलिस आणि भारत सरकारच्या बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचे सागरी प्रशासन महासंचालक श्याम जगन्नाथन यांनी संयुक्तपणे संबोधित केले. या मंचात भारत आणि सायप्रस सरकारचे वरिष्ठ प्रतिनिधी, सागरी प्राधिकरणे, वाणिज्य मंडळे आणि दोन्ही देशांतील प्रमुख सागरी कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. नौवहन, जहाज व्यवस्थापन, जहाज बांधणी आणि दुरुस्ती, नाविकांची भरती आणि प्रशिक्षण, सागरी सेवा, तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि हरित नौवहन या क्षेत्रांतील सहकार्य वाढवणे, हा या मंचाचा मुख्य उद्देश होता. जून २०२५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सायप्रसला भेट दिली होती. त्यानंतर मे २०२६ मध्ये सायप्रसच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताला भेट दिली आणि दोन्ही देशांमधील संबंधांना धोरणात्मक भागीदारीचा दर्जा देण्यात आला. या पार्श्वभूमीवर झालेल्या या मंचात दोन्ही देशांच्या नेतृत्वाने सागरी आणि व्यावसायिक संबंध अधिक बळकट करण्यावर भर दिला.


उद्घाटनपर भाषणात श्याम जगन्नाथन यांनी भारतातील बदलत्या सागरी क्षेत्राचा आढावा घेतला. जहाज बांधणी आणि दुरुस्ती क्षमता वाढवणे, जागतिक स्तरावर भारतीय नाविकांचे प्रमाण वाढवणे, शाश्वत जहाज पुनर्वापर व्यवस्था बळकट करणे, डिजिटलायझेशनला गती देणे आणि हरित नौवहनाकडे वाटचाल करणे यावर भारताचा भर असल्याचे त्यांनी सांगितले. भारताच्या सागरी विकास आराखड्यात जहाज बांधणी क्षेत्रासाठी ६९ हजार ७२५ कोटी रुपयांच्या पॅकेजचा समावेश आहे. यात आर्थिक सहाय्य, सागरी वित्तपुरवठा आणि क्षमता विकास यांचा समावेश आहे. गिफ्ट सिटीचे वाढते महत्त्वही यावेळी अधोरेखित करण्यात आले.






मुख्य भाषणात हाजीमानोलिस यांनी भारत-सायप्रस संबंधांचे वाढते महत्त्व सांगितले. व्यापारी नौवहनासंदर्भातील द्विपक्षीय चौकट ही पुढील सहकार्यासाठी भक्कम आधार असल्याचे त्या म्हणाल्या. जहाजांची मालकी आणि व्यवस्थापन, कायदेशीर व वित्तीय सेवा, विमा, तंत्रज्ञान आणि प्रशिक्षण यांचा समावेश असलेली व्यापक सागरी परिसंस्था सायप्रसमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. युरोपीय संघाचे सदस्यत्व आणि युरोप, आशिया, आफ्रिका व मध्यपूर्वेच्या संगमावर असलेले स्थान यामुळे भारतीय सागरी व्यवसायांसाठी सायप्रस हे प्रवेशद्वार ठरू शकते, असेही त्यांनी नमूद केले. सायप्रस चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष स्टॅव्ह्रोस स्टॅव्ह्रो यांनी दोन्ही देशांच्या सागरी परिसंस्थांमधील पूरक क्षमतांवर भर दिला. भारतातील कुशल मनुष्यबळ आणि औद्योगिक क्षमता तसेच सायप्रसचे जहाज व्यवस्थापनातील कौशल्य यामुळे सहकार्याला मोठी संधी असल्याचे ते म्हणाले. यावेळी सायप्रस चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि भारतातील युरोपीय संघाच्या वाणिज्य मंडळांची परिषद यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यामुळे दोन्ही देशांतील व्यावसायिक समुदायांमध्ये अधिक जवळचे सहकार्य होणार आहे.

Comments
Add Comment

Mission Pedestrian First: महापालिका आयुक्तांच्या ‘मिशन पेडेस्ट्रियन फर्स्ट’लाच अधिकारीच घालतात खिळ?

मुंबई (विशेष प्रतिनिधी): पदपथावरील अतिक्रमण हटवले जाते, पादचारी मुक्त झाले पदपथ बनवले जातात, पण काही दिवसांतच

येत्या गुरुवारी मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांत घेतला जाणार 24 तासांचा पाणीब्लॉक, कोणकोणत्या परिसरात बंद असेल पाणी पुरवठा

मुंबई (विशेष प्रतिनिधी): पवई उच्चस्तरीय जलाशय क्रमांक 1 ते सहार गाव दरम्यान विविध ठिकाणी मुख्य जलवाहिन्यांवरील

Safe Parks Safe Cities: उद्याने, मैदाने आणि मोकळ्या जागांची सुरक्षा वाढवणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी): कुर्ला येथील उद्यानानातील तरुण तरुणीला काही अल्पवयीय मुलांकडून झालेल्या मारहाणीच्या

Mumbai Local News : प्रवाशांचा थरकाप: झोपमोड झाल्याचा राग अनावर; प्रवाशाने केसांत लपवलेल्या ब्लेडने केला स्वतःवर हल्ला

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांचा थरकाप उडवणारी एक धक्कादायक घटना घडली

Nitesh Rane : मदरसे म्हणजे दहशतवादी घडवणारे अड्डे! मंत्री नितेश राणेंचा हल्लाबोल

कुर्ला मारहाण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मदरशांवर बंदीची मागणी मुंबई : कुर्ला येथे एका तरुण-तरुणीला झालेल्या

Kurla Crime: कुर्ल्यातील महाजन उद्यानात तरुण तरुणीला अल्पवयीन टोळक्याकडून झालेल्या मारहाणीची महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाकडून दखल

मुंबई: मुंबईतील कुर्ल्यातील महाजन उद्यानामध्ये एका जोडप्याला अल्पवयीन टोळक्यांकडून मारहाण झाल्याचा प्रकार