Pune Shivajinagar Court Firing : पुण्यात शिवाजी नगर येथे भरदिवसा गोळीबाराची घटना; गोळीबारानंतर कोयत्याने एकावर हल्ला

पुण्यात शिवाजी नगर येथे कोर्टाबाहेर भरदिवसा गोळीबाराची घडना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोर्टाबाहेर गोळीबार करत एकावर कोयत्यानेही हल्ला करण्यात आला आहे.

Pune Shivajinagar Court Firing : पुण्यात शिवाजी नगर येथे कोर्टाबाहेर भरदिवसा गोळीबाराची घडना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोर्टाबाहेर गोळीबार करत एकावर कोयत्यानेही हल्ला करण्यात आला आहे. शिवाजीनगर कोर्टाबाहेरील परिसरात गेट नंबर 4 वर ही घटना घडली आहे. तीन- चार जणांच्या या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. बंदूक फेकून हल्लेखोर फरार झाले आहेत. दरम्यान, या घटनेत एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली असून प्रकृती अत्यंत अत्यवस्थेत आहे. पोलिसांनी या घटनेनंतर परिसर सील केला आहे.






कोयत्याने हल्ला करत दोन्ही हात छाटले


सदर घटनेनंतर वरिष्ठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोरांनी गोळीबार केल्यानंतर एका व्यक्तीवर कोयत्याने वार केला आहे. मात्र, या हल्ल्यात संबंधित व्यक्तीचे दोन्ही हात छाटले गेले आहेत, असे प्राथमिक माहितीमध्ये समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वीच पुणे न्यायालयाला उडवून देण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर आता न्यायालयाच्या दारातच हत्या झाल्याने पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे.


यावेळी प्रत्यक्षदर्शीने, पूर्ण लोड मॅगझिन घटनास्थळावर पडलेली पाहिली असून, आम्ही वर कोर्टात होतो दुसऱ्या मजल्यावर, तेथून खिडकीजवळ आलो, तिथे दिसलं की एका इसमाच्या मागे पळत आहेत आणि गोळीबार सुरू आहे, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. तसेच पुढे बोलताना, तोफखाना चौकटीत पळत जातं दिसल. पुणे शहराची गुन्हेगारी टॉप लेव्हलला गेली आहे. कोर्ट संरक्षणासाठी पोलीस तेथे होते त्यामुळे तातडीनं ते घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमी व्यक्तीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. ती व्यक्ती कोण होती ते समजू शकलं नाही. परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेर झालेल्या गोळीबारातील 2 पिस्टल फेकत आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. मृत व्यक्ती एका हत्येच्या प्रकरणात साक्षीदार असल्याची माहिती समोर आली

बातमी अपडेट होत आहे...
Comments
Add Comment

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेवरील आणखी दोन स्थानकं खुली; कधीपासून प्रवास करता येणार?

पुणे: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. हिंजवडी आयटी पार्कमधील नोकरदारांना वाहतूक कोंडीतून मेट्रोच्या पिंक

EPFO New Rules 2026: PF पैसे आता हप्त्यांमध्ये काढता येणार? EPFO च्या नव्या योजनेत करसवलतीचाही प्रस्ताव

EPFO New Rules 2026: नोकरदार व्यक्तींसाठी, पीएफ हा केवळ बचतीचा स्रोत नाही, तर सेवानिवृत्तीनंतर मिळणारा आर्थिक आधारही असतो.

Dhule News: पहाटे दोन वाजता तक्रार, तासाभरात पोलिसांची कारवाई! धुळ्यात धर्मांतराच्या आरोपावरून गुन्हा

धुळे शहरात अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या

Palghar Accident : खेळताना खिडकीजवळ गेला अन् तोल गेला, सहा वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी अंत ; 15 दिवसांपूर्वीच हरवले होते आईचे छत्र

Palghar News : महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नायगाव पूर्व येथील एका निवासी

CRPF Recruitment: CRPF मध्ये डॉक्टरांसाठी भरती! 19 पदांसाठी थेट मुलाखत, 85 हजार रुपये पगार

CRPF Recruitment 2026: सीआरपीएफमध्ये नोकरीची एक महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाली आहे. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेले तरुण थेट

PM Kisan Yojana : 25व्या हप्त्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट ! Farmer ID नसेल तर काय होणार ? जाणून घ्या नियम

PM Kisan Samman Nidhi : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून दरवर्षी ६