Pune Shivajinagar Court Firing : चार दिवसांपूर्वी जामीन, आज कोर्टाबाहेर हत्या! पुण्यात गोळीबाराने खळबळ

पुण्यात शिवाजी नगर परिसरात कोर्टाबाहेर भरदिवसा गोळीबाराची घडना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कोर्टाबाहेर गोळीबारासोबतच एकावर कोयत्यानेही हल्ला करण्यात आला. शिवाजीनगर कोर्टाबाहेरील परिसरात गेट नंबर 4 वर ही घटना घडली आहे.

Pune Shivajinagar Court Firing : पुण्यात शिवाजी नगर परिसरात कोर्टाबाहेर भरदिवसा गोळीबाराची घडना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कोर्टाबाहेर गोळीबारासोबतच एकावर कोयत्यानेही हल्ला करण्यात आला. शिवाजीनगर कोर्टाबाहेरील परिसरात गेट नंबर 4 वर ही घटना घडली आहे. तीन- चार जणांच्या या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला. हल्लेखोर बंदूक फेकून तेथून फरार झाले आहेत. पोलिसांनी या घटनेनंतर परिसर सील केला आहे.मृत झालेल्या व्यक्तीचे नाव मंदार किवळे असून त्याची काही दिवसांपूर्वीच जामीनावरून सुटका झाली होती.






ज्या हत्या प्रकरणात मंदार किवळे हा जामिनावर बाहेर आला होता, त्याच प्रकरणाशी त्याचे धागेदोरे जोडले गेले असल्याचे सांगितले जात आहे. कात्रज येथील संतोषनगर परिसरात जागेच्या वादातून शुभम सुभाष चव्हाण या तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणात आंबेगाव पोलिसांनी सराईत गुन्हेगार अमर दिलीप साकोरे (वय 40) याच्यासह मंदार मारुती किवळे (वय 35), गिरीश सुभाष बाबरे (वय 25) आणि योगेश बाबुराव ढोरे (वय 35) या चौघांना अटक केली होती. या घटनेची पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत शुभम चव्हाण आणि मुख्य आरोपी अमर साकोरे यांच्यात एका जागेवरून वाद सुरू होता. हत्येच्या दिवशी पहाटे शुभम कात्रजमधील संतोषनगर भागातून निघाला होता. त्यावेळी अमर साकोरे आणि मंदार किवळेसह त्याच्या इतर साथीदारांनी शुभमला अडवून शिवीगाळ व मारहाण सुरू केली. त्यावेळी आरोपींच्या तावडीतून वाचण्यासाठी शुभम पळाला असता, आरोपींनी त्याचा पाठलाग केला. त्यावेळी त्याला बांबूने बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आला होता.


या खूनानंतर आंबेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक शरद झिने यांच्या पथकाने मंदार किवळेसह चौघा आरोपींना अटक केली होती. गुप्त माहितीच्या आधारे कामठी बु. येथे छापा टाकून त्यांना अटक करण्यात आली होती. अलीकडेच 4 दिवसांपूर्वी मंदार किवळे जामिनावर बाहेर आला होता. त्यामुळे आता शिवाजीनगर कोर्टाबाहेर झालेल्या हल्ल्यात मंदारचा गेम झाल्याचे बोलले जात आहे, हा हल्ला जुन्या वैमनस्यातून आणि बदल्याच्या भावनेतूनच झाला असावा, या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, पुणे पोलिसांनी दोन आरोपींची ओळख पटवली असून तपासासाठी पथके रवाना केली आहेत.

Comments
Add Comment

Constitution Day: संविधान दिन विशेष! आजच्या Gen Z पिढीला माहीत आहेत का संविधानातील मूलभूत अधिकार?

भारतामध्ये दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील हा

Pune Shivajinagar Court Firing : पुण्यात शिवाजी नगर येथे भरदिवसा गोळीबाराची घटना; गोळीबारानंतर कोयत्याने एकावर हल्ला

Pune Shivajinagar Court Firing : पुण्यात शिवाजी नगर येथे कोर्टाबाहेर भरदिवसा गोळीबाराची घडना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेवरील आणखी दोन स्थानकं खुली; कधीपासून प्रवास करता येणार?

पुणे: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. हिंजवडी आयटी पार्कमधील नोकरदारांना वाहतूक कोंडीतून मेट्रोच्या पिंक

EPFO New Rules 2026: PF पैसे आता हप्त्यांमध्ये काढता येणार? EPFO च्या नव्या योजनेत करसवलतीचाही प्रस्ताव

EPFO New Rules 2026: नोकरदार व्यक्तींसाठी, पीएफ हा केवळ बचतीचा स्रोत नाही, तर सेवानिवृत्तीनंतर मिळणारा आर्थिक आधारही असतो.

Dhule News: पहाटे दोन वाजता तक्रार, तासाभरात पोलिसांची कारवाई! धुळ्यात धर्मांतराच्या आरोपावरून गुन्हा

धुळे शहरात अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या

Palghar Accident : खेळताना खिडकीजवळ गेला अन् तोल गेला, सहा वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी अंत ; 15 दिवसांपूर्वीच हरवले होते आईचे छत्र

Palghar News : महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नायगाव पूर्व येथील एका निवासी