संविधान दिनावर पंतप्रधान मोदींचा मोठा संदेश; 'विकसित भारत'च्या स्वप्नासाठी संविधानाचा मार्गदर्शक दीप!

संविधान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना शुभेच्छा देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान निर्मात्यांना आदरांजली वाहिली. 26 नोव्हेंबरच्या या ऐतिहासिक दिवसाची पार्श्वभूमी आणि संविधानातील मूल्यांच्या जतनाचा संकल्प यावर त्यांनी विशेष भर दिला.

नवी दिल्ली : भारतीय लोकशाहीचा अमूल्य वारसा असलेल्या संविधानाच्या दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशवासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह संविधान सभेतील सर्व सदस्यांना विनम्र आदरांजली अर्पण केली.


सोशल मीडिया मंच 'एक्स'वरील पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की, विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी भारतीय संविधान देशाला सातत्याने योग्य दिशा आणि मार्गदर्शन देत राहील. संविधान दिन हा केवळ एक सोहळा नसून, संविधान निर्मात्यांचा सन्मान करण्याचा दिवस आहे. संविधानात अंतर्भूत असलेल्या मूल्यांचे जतन आणि संवर्धन करण्याच्या देशाच्या कटिबद्धतेचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. या विशेष प्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या व्हिडिओ पोस्टद्वारे संस्कृतमधील श्लोकही देशवासीयांशी शेअर केले.





भारतात दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात संविधान दिन साजरा केला जातो. 1949 मध्ये याच दिवशी संविधान सभेने भारतीय संविधानाचा औपचारिक स्वीकार केला होता. त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी संविधान प्रत्यक्षात लागू झाले आणि भारत एक सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून अस्तित्वात आले.


या दिवसाच्या आयोजनामागे एक महत्त्वाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. 2009 मध्ये नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यात 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याची परंपरा सुरू केली होती. पुढे 2015 मध्ये देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त संपूर्ण भारतात हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.


26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याबाबत केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने 19 नोव्हेंबर 2015 रोजी अधिकृत अधिसूचना जारी केली. भारतीय संविधान स्वीकारल्याच्या 65 वर्षांनंतर घेण्यात आलेला हा निर्णय ऐतिहासिक ठरला. सर्वसामान्य नागरिकांमध्ये संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचा प्रसार करणे, हा या दिवसाच्या आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे.

Comments
Add Comment

ढाब्यावर जेवण सुरू असतानाच हल्लेखोर आले आणि... रोहतकमधील गोळीबारामागचे धक्कादायक गुपित काय?

मुंबई: हरियाणातील रोहतक जिल्ह्यामध्ये मध्यरात्री घडलेल्या एका रक्तरंजित घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला

'त्या' एका फोटोमुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला; रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार?

मुंबई इंडियन्सने आपल्या आयपीएल 2027  साठीच्या कर्णधाराबद्दल उत्सुकता वाढवली आहे. मुंबई इंडियन्सने बुधवारी

World Heritage Week: लखनऊ राज्य संग्रहालयात जागतिक वारसा सप्ताहाचा समारोप; स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील राज्य संग्रहालयात जागतिक वारसा सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित

'या' रेल्वे शेअरमध्ये तुफान तेजी! एका दिवसात 20% वाढ, गुंतवणूकदारांचे लक्ष

बुधवारी शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली असून सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशकांनी मोठी उसळी घेतली

Modi cabinet decisions today : मोदी मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय! तब्बल १९,९३४ कोटींची तरतूद; देशांतर्गत उत्पादनाला मिळणार मोठी चालना

विमानतळ, बंदर विस्तार आणि टपाल सेवांच्या आधुनिकीकरणाचा आराखडा मंजूर नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra Modi)

Yogi Adityanath : "कमळ हेच आमचे सर्वस्व; मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण, हे सर्वांनाच माहीत आहे" : योगी आदित्यनाथ यांचे ठाम वक्तव्य

मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून सुरू असलेल्या चर्चांना योगींचे उत्तर उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील पुढील