
मुंबई(विशेष प्रतिनिधी): ऊर्जा संवर्धन आणि पर्यावरणपूरक शाश्वत विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेच्या जी दक्षिण विभागाने महानगरपालिकेच्या विविध मालमत्तांमध्ये 12 किलोवॅट क्षमतेचे ऑन-ग्रिड सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमामुळे पारंपरिक वीजपुरवठ्यावरील अवलंबित्व कमी करण्यासोबतच महानगरपालिकेच्या वीजबिलावरील खर्चात लक्षणीय बचत होत आहे.
मुंबई महानगरपालिका पर्यावरणपूरक बाबींना प्रोत्साहन देण्यासाठी सदैव प्रयत्नरत असते. याच धर्तीवर, महानगरपालिकेच्या कार्यालयीन इमारतींमध्ये अशाप्रकारच्या पर्यावरणपूरक बाबी प्रत्यक्ष अंमलात आणून शाश्वत विकासाबाबत प्रयत्न केले जात आहेत. या उपक्रमांतर्गत वरळी स्मशानभूमी तसेच महानगरपालिकेच्या विविध शाळांसह महानगरपालिकेच्या अन्य कार्यालयीन इमारतींमध्ये सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या प्रकल्पांच्या अंमलबजावणीनंतर मे आणि जून 2026 या दोन महिन्यांतील वीज वापर आणि वीजबिलांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
Mumbai 26/11 attack: मुंबई दहशतवादी हल्ल्या 26/11 म्हंटल की ती काळी रात्र आजही डोळ्यासमोरून जात नाही. समुद्रमार्गे आलेल्या 10 दहशतवाद्यांनी संपूर्ण मुंबईला वेठीस ...
गत काही महिन्यांतील तुलनात्मक आकडेवारीनुसार, मुंबई महानगरपालिकेच्या आठ कार्यालयीन इमारतींमध्ये एकत्रित वीज वापर मे 2026 मध्ये 23,701 युनिट्स होता. तो जून 2026 मध्ये 11,318 युनिट्सवर आला. म्हणजेच एका महिन्यात वीज वापरामध्ये 12,383 युनिट्सची घट नोंदविण्यात आली आहे. याचबरोबर, या आठ मालमत्तांचे एकत्रित वीजबिल मे 2026 मध्ये 2 लाख 32 हजार 46 रुपये होते. जून 2026 मध्ये ते 1 लाख 21 हजार 288 रुपयांवर आले. म्हणजेच एका महिन्यात वीजबिलाच्या रकमेत 1 लाख 10 हजार 758 रुपयांची, अर्थात सुमारे 47.73 टक्क्यांची घट झाली आहे.
सौरऊर्जेचा वापर हा महानगरपालिकेच्या पायाभूत सुविधांना अधिक ऊर्जा कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या माध्यमातून दीर्घकालीन वीज खर्चात बचत, स्वच्छ ऊर्जेचा वापर आणि पारंपरिक वीज वापरामुळे होणारा पर्यावरणीय परिणाम कमी करण्यास मदत होणार आहे.
पुण्यात कोर्ट परिसरात दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबाराने शहर हादरलेले असतानाच, आता मुंबईतही गोळीबाराची खळबळजनक घटना घडली आहे. मुंबईतील माहीम परिसरात ...
महानगरपालिकेच्या सार्वजनिक मालमत्तांमध्ये अक्षय ऊर्जेचा वापर वाढविणे, ऊर्जा संवर्धनाला प्राधान्य देणे आणि सार्वजनिक निधीचा अधिक कार्यक्षम वापर करणे या उद्दिष्टांसाठी जी दक्षिण विभागाकडून असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. तसेच, या सौरऊर्जा प्रकल्पांमुळे होणाऱ्या बचतीचे नियमित निरीक्षण करून महानगरपालिकेच्या अन्य मालमत्तांमध्येही सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या संधींचा शोध घेण्यात येणार असल्याचे उप आयुक्त (परिमंडळ 2) प्रशांत सपकाळे, जी दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर यांनी सांगितले.



