Land Records : भूमि अभिलेख विभागाच्या 20 सेवांचे सुसूत्रीकरण; आता नागरिकांना मिळणार 6 प्रमुख सेवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे.

मुंबई : राज्यातील नागरिकांची जमीन आणि मालमत्तेशी संबंधित कामे अधिक जलद, सोपी आणि पारदर्शक व्हावीत, यासाठी राज्य सरकारने भूमि अभिलेख विभागाच्या सेवांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. विभागाच्या आधीच्या 20 सेवांचे सुसूत्रीकरण करून त्यांचे आता 6 प्रमुख सेवांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे.






नियोजन विभागाच्या नियमांनुसार आणि मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या मंजुरीनंतर महसूल विभागाने यासंदर्भात आदेश जारी केला आहे. नागरिक, शासकीय विभाग आणि व्यापाऱ्यांना या सेवा ऑनलाइन पोर्टल, 'आपले सरकार' आणि 'मैत्री' पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.



कोणत्या 6 प्रमुख सेवा मिळणार?


भूमि अभिलेख विभागाच्या नव्या व्यवस्थेत पुढील सेवांचा समावेश करण्यात आला आहे.




  1. सर्व प्रकारच्या जमीन मोजणी आणि काम पूर्ण झाल्यानंतर मोजणी नकाशाची 'क' प्रत देणे.

  2. आकारफोड, कमी-जास्त पत्रक तयार करणे आणि नकाशात दुरुस्ती करणे.

  3. सर्व प्रकारच्या फेरफार नोंदी करणे.

  4. ऑनलाइन उपलब्ध नसलेले नकाशे आणि जुनी कागदपत्रे उपलब्ध करून देणे.

  5. मिळकत पत्रिकेचे विभाजन करून स्वतंत्र मिळकत पत्रिका तयार करणे.

  6. भूसंपादनांतर्गत रस्ता, रस्ता सेटबॅक आणि आरक्षित जागेसाठी स्वतंत्र मिळकत पत्रिका तयार करणे.


ऑनलाइन कागदपत्रांच्या प्रती देणाऱ्या सेवा बंद


ज्या जुन्या नोंदी आणि कागदपत्रांचे स्कॅनिंग व संगणकीकरण पूर्ण झाले आहे आणि ज्या ऑनलाइन उपलब्ध आहेत, त्यांच्या प्रती देण्याच्या काही सेवा बंद करण्यात आल्या आहेत. यामध्ये मिळकत पत्रिका, टिपण, क्षेत्रबुक, प्रतिबुक, शेतपुस्तक, जबाब, फाळणी, आकारबंद, गटनकाशा, मोजणी नकाशा आणि अपील निकालांच्या प्रतींचा समावेश आहे.


तसेच नेहमीची आणि तातडीची मोजणी, विविध प्रकारच्या आकारफोडी, कमी-जास्त पत्रकाला मंजुरी, फेरफार नोंदी आणि मिळकत पत्रिकेचे विभाजन यांसारख्या समान स्वरूपाच्या सेवा एकत्र करण्यात आल्या आहेत. अद्याप ऑनलाइन उपलब्ध नसलेल्या मूळ कागदपत्रांचे आणि नकाशांचे स्कॅनिंग करून त्यांची माहिती 'ई-महाभूमी' पोर्टलवर उपलब्ध करून देण्यासाठी नवीन सेवा सुरू करण्यात आली आहे.



तक्रार आणि अपील कुठे करता येणार?


या सेवांशी संबंधित तक्रार किंवा अपील असल्यास पहिल्या अपीलासाठी जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, उप अधीक्षक भूमि अभिलेख किंवा नगर भूमापन अधिकारी यांच्याकडे जाता येईल. दुसऱ्या अपीलासाठी उपसंचालक भूमि अभिलेख यांच्याकडे दाद मागता येणार आहे.


या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक नियम आणि तांत्रिक सूचना जमाबंदी आयुक्त तथा संचालक भूमि अभिलेख, पुणे यांच्याकडून दिल्या जातील. तर ऑनलाइन व्यवस्था विकसित करून विविध पोर्टलशी जोडण्याची जबाबदारी भूमि अभिलेख विभाग आणि 'महाआयटी' यांच्याकडे असेल.



अनावश्यक कागदपत्रे आणि फेऱ्या कमी होणार


“नागरिकांना शासनाच्या सेवा अधिक जलद, पारदर्शक आणि पूर्णतः डिजिटल स्वरूपात मिळाव्यात, यासाठी आम्ही काम करत आहोत. 20 सेवांचे सुसूत्रीकरण करून 6 प्रमुख सेवांमध्ये रूपांतर केल्यामुळे अनावश्यक कागदपत्रे, कार्यालयीन फेऱ्या आणि मंजुरीचे टप्पे कमी होतील. तसेच सर्व सेवा कालबद्ध पद्धतीने उपलब्ध होतील,” असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.


Comments
Add Comment

वाहन धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या वापरावर बंदी; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी सरकारने कठोर

अॅग्रीस्टॅकमुळे 1 कोटी 44 लाख शेतकऱ्यांना मिळाली डिजिटल ओळख; महाराष्ट्र देशात दुसरा

शेतकऱ्याला आता योजनेसाठी वारंवार कागदपत्रं घेऊन फिरावं लागणार नाही. एकच ओळख, एकच आयडी आणि सगळ्या योजना एका

राज्यात 174 नव्या डिजिटल सेवांचा शुभारंभ! 26 जानेवारीपर्यंत सरकारी कामकाजात मोठा बदल; मुख्यमंत्र्यांची घोषणा

राज्यातील शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पारदर्शक, गतिमान आणि मानवी हस्तक्षेप कमीत कमी ठेवून

Raigad News : फ्लॅट नव्हे, गावाच्या पद्धतीनुसार घरे बांधणार; दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्राधान्य

रायगड: दरड दुर्घटनांमध्ये घरांचे नुकसान झालेल्या कुटुंबांना आता फ्लॅट पद्धतीने नव्हे, तर त्यांच्या गावाच्या

Chandrashekhar Bawankule : राज्यातील प्रत्येक सदनिकेसाठी स्वतंत्र मालमत्ता पत्रिका

मुंबई : राज्यातील प्रत्येक सदनिकेची स्वतंत्र मालमत्ता पत्रिका तयार करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे.

Pune Mumbai Highway : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर; 18.40 लाखांचा निधी मंजूर

मुंबई : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील अपघातांचे धोके कमी करण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभागाने महत्त्वाचे