Thursday, November 26, 2026

Mumbai Pollution: विकासकांकडून प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन, स्थायी समितीत तीव्र पडसाद

विकासकांकडून प्रदूषणाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा मुद्दा स्थायी समितीत गाजला. बांधकाम ठिकाणी धुळीवर नियंत्रण नसणे, कचरा उघड्यावर टाकणे आणि नियमांना केराची टोपली दाखवल्याबद्दल सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विकासकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईत प्रदुषणाची पातळी वाढत असून याबाबत 28 मार्गदर्शक तत्वांची नियमावली बनवण्यात आली. परंतु या नियमांची पायमल्ली मुंबईतील काही विकासकांकडून केली जात आहे. मुंबईत प्रदुषण नियंत्रणाबाबतच्या नियमांचे पालन होत नसल्याने संपूर्ण इमारत बांधकामांची पाहणी केली जावी आणि पुढील 15 दिवसांमध्ये याचा अहवाल स्थायी समितीपुढे मांडला जावा असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिले.(BMC)

मुंबई महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत यशोधर फणसे यांनी प्रदुषणाबाबतचा मुद्दा उपस्थित करत के पश्चिम येथील वर्सोवा परिसरात एका विकासकाने रस्त्यांचे दुभाजक काढून तेथे मनमानी कारभार करावा अशाप्रकारच्या बांधकामाला सुरुवात केल्याचे सांगितले. रस्ता दुभाजक काढल्याने वाहने कशाही प्रकारे चालवली जात असून याठिकाणी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच बांधकामांमुळे या परिसरात धुळीचेही साम्राज्य पसरले आहे. याठिकाणी 28 मार्गदर्शक नियमावलीचे पालनही केले जात नाही. त्यामुळे येथील आसपासच्या परिसरात ही समस्या निर्माण झाल्याबाबत चिंता व्यक्त केली.(Pollution Control)

याला सभागृहनेते गणेश खणकर यांनीही पाठिंबा देता काही विकासक तर मनमर्जी वागत असून ररस्त्यांचे दुभाजक तोडण्यापर्यंत त्यांची मजल गेली असेल तर ते गंभीर आहे. काही अधिकारी असे वागतात की विकासकांकडून अशाप्रकारच्या कामांकडे दुर्लक्ष करतात. पदपथांवर वाहने चढवली जातात, तरीही त्यांना विचारणा करत नाही. त्यामुळे विकासक आणि अधिकारी यांचे काही साटेलोटे आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे, आज सकाळी चार वाजता डंपर येतात, त्यामुळे लोकांची झोपमोड होते, तसेच पायलिंगचे काम तर उशिरापर्यंत चालते याकडेही त्यांनी लक्ष वेधून चिंता व्यक्त केली.

यावर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी जर विकासकाने रस्त्यांवरील दुभाजक तोडले असतील ते त्वरीत त्यांच्याकडून बसवून घेतले जावेत. विकासकांना पाणी मारण्याची सक्ती केली आहे, तरीही त्याचे पालन होत नाही. त्यामुळे मुंबईतील सर्वच बांधकामांची त्वरीत पाहणी करून त्याचा अहवाल स्थायी समितीपुढे सादर केला जावा असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.(Air Quality)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >