
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) वरील, वरळी जेट्टी येथील विद्यमान जेट्टीचा विकास आता विकासासाठी सार्वजनिक खाजगी भागिदारी (पीपीपी) तत्वावर केला जाणार आहे. तसेच याठिकाणी हॅलिपॅडही उभारण्यात येणार आहे. यासाठी रेमंड लिमिटेड यांची निवड करण्यात आली आहे. याठिकाणी लँडींग किंवा टेक-ऑफच्या संख्येची अट न ठेवता, दरमहा एक लाख रुपये ही निश्चित रक्कम महानगरपालिकेला द्यावी लागेल. याशिवाय, हेलिपॅडवरून होणाऱ्या व्यावसायिक हेलिकॉप्टर लँडींगआणि टेक-ऑफमधून दरमहा मिळणाऱ्या महसुलाच्या 50 टक्के रक्कम किंवा चार लाख रुपये यांपैकी जी रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा होणार आहे.(Worli Helipad)
मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईत प्रदुषणाची पातळी वाढत असून याबाबत 28 मार्गदर्शक तत्वांची नियमावली बनवण्यात आली. परंतु या नियमांची पायमल्ली मुंबईतील ...
मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाच्या (दक्षिण) बांधकामादरम्यान, डिझाइन बिल्ड कंत्राटदारांमार्फत बांधकाम साहित्याच्या वाहतुकीसाठी वरळी डेअरीसमोर एक तात्पुरते धक्का (जेट्टी) बांधण्यात आली होती. या जेट्टीचे रूपांतर आता वैद्यकीय स्थलांतर / आपत्कालीन स्थलांतर, किनारी निगराणी, सराव आणि गस्त घालणे, नैसर्गिक आपत्तींच्या वेळी जनतेला मदत करण्यासाठी, व्हीव्हीआयपी / व्हीआयपींच्या उड्डाणांना, सार्वजनिक/शासकीय संस्थांच्या हितासाठी हॅलिफॅडसाठी केले जाणार आहे.(Worli Jetty)
आयआयटी तसेच पवन हंसच्या निष्कर्षांवर आधारित, जेटीचे रूपांतर हेलिपॅड मध्ये करण्याकरिता, सुविधा विकसित करण्यासाठी, देखभाल करण्यासाठी आणि संयोजन करण्यासाठी 'जसे आहे तसे' या तत्त्वावर पीपीपी ऑपरेटरची नियुक्ती करण्याचे ठरले. त्यानुसार , स्वारस्याची अभिव्यक्ती म्हणून मागवण्यात आले. यामध्ये रेमंड लिमिटेडची निवड करण्यात आली आहे. जेट्टीचा विकास, बांधकाम, संचालन व देखभाल आणि आवश्यक त्या मंजू-या संदर्भातील सर्व खर्च रेमंड लिमिटेड यांच्याकडून करण्यात येतील.
तेलंगणामध्ये एक संतापजनक आणि खळबळजनक घटना घडली आहे. बापानेच पोटच्या लेकीचा खून केल्याच्या घटनेमुळे आदिलाबाद जिल्हा हादरून गेला आहे. आपल्या लेकीचे ...
रेमंड लिमिटेड यांची वरळी येथील विद्यमान जेट्टीच्या विकासासाठी पीपीपी ऑपरेटर म्हणून नियुक्ती करण्याकरिता आर्थिक भागिदारी तत्त्वावर ज्यामध्ये परवान्यासाठी वास्तुशास्त्रीय बदल करणे, डीजीसीए परवानाधारक हेलिपॅडसाठी असलेल्या सर्व सुविधा पुरवणे, हेलिपॅडचे अनिवार्य सुरक्षित आणि कार्यक्षम संचालन व करण्यासाठी नियुक्त करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला स्थायी समिती अध्यक्षांनी मंजुरी दिल्यामुळे हा प्रस्तावानुसार पुढील कार्यवाही आता केली जाणार आहे. या माध्यमातून महापालिकेच्या महसूलात भर पडणार आहे.(Mumbai Development)





