Nashik Crime : नाशिकमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये स्फोटकांचा साठा ! जिलेटीनच्या 200 कांड्या, डिटोनेटर बॅटरी जप्त

कसबे वणी येथील जगदंबानगर परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये जिलेटीनच्या २०० कांड्यांसह अन्य स्फोटक साहित्य लपवून ठेवल्याचे उघड झाले आहे. वणी पोलिसांनी छापा टाकत सुमारे ७ हजार रुपये किमतीचा स्फोटक साठा जप्त केला आहे.

Nashik Crime : नाशिक जिल्ह्यात अवैध स्फोटक पदार्थांच्या साठ्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कसबे वणी येथील जगदंबानगर परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये जिलेटीनच्या २०० कांड्यांसह अन्य स्फोटक साहित्य लपवून ठेवल्याचे उघड झाले आहे. वणी पोलिसांनी छापा टाकत सुमारे ७ हजार रुपये किमतीचा स्फोटक साठा जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.



नेमकं प्रकरण काय ?


मिळालेल्या माहितीनुसार, कसबे वणी येथील जगदंबानगर परिसरात दीपक संजय सुरासे याच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना स्फोटक पदार्थांचा साठा असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फड यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास संबंधित ठिकाणी छापा टाकला.






जिलेटीनच्या 200 कांड्या जप्त


या कारवाईत पोलिसांना ३ हजार रुपये किमतीच्या २०० जिलेटीनच्या कांड्या, ३ हजार ५०० रुपये किमतीची लाल रंगाची 'DEF Corex' वायर आणि ५०० रुपये किमतीची डिटोनेटर बॅटरी आढळून आली. पोलिसांनी हे सर्व साहित्य जप्त केले असून, जप्त करण्यात आलेल्या स्फोटकांची एकूण किंमत ७ हजार रुपये असल्याची माहिती आहे. प्राथमिक तपासात दीपक सुरासे आणि ओझरमिग येथील संदीप अक्कर यांनी संगनमताने कोणताही अधिकृत शासकीय परवाना किंवा स्फोटक पदार्थ हाताळण्याचे प्रमाणपत्र नसताना हा साठा बाळगल्याचे समोर आले आहे. तसेच संदीप अक्कर याने दीपक सुरासे याला हे स्फोटक पदार्थ पुरवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.



वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


याप्रकरणी पोलीस हवालदार मुज्जम्मील देशमुख यांच्या फिर्यादीवरून दीपक संजय सुरासे (वय ३२, रा. जगदंबानगर, कसबे वणी) आणि संदीप अक्कर (रा. ओझरमिग, ता. निफाड) या दोघांविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात (Wani Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दीपक सुरासे याला अटक केली असून, दुसऱ्या आरोपीबाबत पुढील तपास सुरू आहे. या पत्र्याच्या शेडमध्ये स्फोटकांचा साठा नेमका कोणत्या उद्देशाने ठेवण्यात आला होता आणि त्याचा वापर कुठे केला जाणार होता, याचा तपास आता वणी पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment

S400 missile system India : शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर भारताची करडी नजर; नियंत्रण रेषेवर S-400 सह लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे सज्ज होणार

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या लष्करी हालचालींना आणि बदलत्या धोक्यांना तोंड देण्यासाठी भारताने आपल्या संरक्षण

पहाटे 2 वाजता सीमेवर खळबळ! पठाणकोटमध्ये पाकिस्तानी घुसखोराला बीएसएफने ठोकले; हाय अलर्ट जारी

पठाणकोट : पंजाबमधील पठाणकोट येथे भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा एक मोठा प्रयत्न सीमा सुरक्षा

आधी बॉयफ्रेंडला पळवलं, नंतर तरूणीवर जंगलात अत्याचार; घटनेमुळे नागपूर शहर हादरलं...

नागपूर: नागपूर शहरातील सोनेगाव तलाव परिसरापासून जवळ असलेल्या एका निर्जन जंगल भागात 19 वर्षीय तरुणीवर अत्याचार

वादग्रस्त प्रवासातून थेट जागतिक विक्रमाकडे! समय रैनाने रचला इतिहास; 1 million paid members गाठणारा जगातील पहिला YouTuber

डिजिटल मनोरंजन विश्वात खळबळ उडवून देणारी एक ऐतिहासिक घटना समोर आली आहे. लोकप्रिय स्टँड-अप कॉमेडियन समय रैनाने

PM Modi cabinet meeting today : दिल्लीत राजकीय हालचालींना मोठा वेग; पंतप्रधानांची कॅबिनेट बैठक आणि भाजपच्या राष्ट्रीय मंथनाची सुरुवात

नवी दिल्ली : देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये आज (शुक्रवारी) राजकीय आणि प्रशासकीय दृष्ट्या अनेक महत्त्वाच्या

Nagpur Crime: एमडी ड्रग्सचा वाद अन् थेट जीवघेणा हल्ला! नागपुरात पाच जणांनी तरुणाला घेरलं; मित्रालाही मारहाण

उपराजधानी नागपुरात गुन्हेगारीच्या घटनांमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. एमडी ड्रग्सच्या कथित तस्करीच्या