Nashik : एचएसआरपी नंबर प्लेट नसल्यास कारवाईचा बडगा ! नाशिकमध्ये 12 हजारांहून अधिक वाहनांवर कारवाई

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, नाशिकमध्ये १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेली एकूण ११ लाख २० हजार ९९९ वाहने आहेत. त्यापैकी केवळ ४ लाख १८ हजार ३१८ वाहनांवरच एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यात आल्या आहेत.

नाशिक : तुमच्या वाहनाला अजूनही एचएसआरपी नंबर प्लेट बसवलेली नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण एचएसआरपी नंबर प्लेट न बसवणाऱ्या वाहनधारकांविरोधात परिवहन विभागाने आता कडक कारवाई सुरू केली आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल १२ हजार ६८३ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, १० लाखांहून अधिक रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. केंद्रीय मोटार वाहन नियमांनुसार वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजेच एचएसआरपी नंबर प्लेट बसवणे बंधनकारक आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यातील अनेक वाहनधारकांनी अद्याप या नियमाकडे दुर्लक्ष केल्याचं समोर आलं आहे.


प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, नाशिकमध्ये १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेली एकूण ११ लाख २० हजार ९९९ वाहने आहेत. त्यापैकी केवळ ४ लाख १८ हजार ३१८ वाहनांवरच एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यात आल्या आहेत. म्हणजेच ६० टक्क्यांहून अधिक वाहनांवर अद्याप ही नंबर प्लेट बसवण्यात आलेली नाही.






12 हजारांहून अधिक वाहनांवर कारवाई


त्यामुळे परिवहन विभागाने १ जुलै २०२६ पासून विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. आरटीओची वायुवेग पथके महामार्ग, प्रमुख रस्ते, तपासणी नाके आणि गर्दीच्या ठिकाणी वाहनांची तपासणी करत आहेत. दुचाकींपासून चारचाकी वाहनांपर्यंत सर्व वाहनांची तपासणी केली जात आहे. या मोहिमेदरम्यान आतापर्यंत १२ हजार ६८३ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, सुमारे १० लाख ५२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत ही विशेष तपासणी आणि कारवाई मोहीम सुरू राहणार आहे.


दरम्यान, वाहनधारकांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी परिवहन विभागाने दोन संकेतस्थळांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. वाहनधारकांनी maharashtrahsrp.com किंवा transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर ऑनलाइन अर्ज करून नंबर प्लेट बसवून घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळे तुमच्या वाहनावर अजूनही एचएसआरपी नंबर प्लेट नसेल, तर विलंब न करता ती बसवून घ्या. अन्यथा आरटीओच्या तपासणीत पकडले गेल्यास दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागू शकतं.

Comments
Add Comment

मुंबई राष्ट्रवादीच्या युवक अध्यक्षपदी अर्जुन मेघे -पार्थ पवारांकडून नियुक्ती; यापूर्वीच्या नियुक्त्यांवरून वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजीची चर्चा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक नियुक्त्यांमध्ये खासदार पार्थ पवार यांच्याशी निकटचे संबंध

Gondia breaking news today : गोंदियात मोठी दुर्घटना! भरधाव पोलीस वाहनाने दुचाकीला चिरडले; ३ तरुणांचा जागीच अंत, संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग रोखला!

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात भरधाव वेगातील पोलीस गाडीने एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याची अत्यंत दुःखद घटना घडली

'रामायण'ने 'पुष्पा 2'ला मागे टाकलं! आता 'बाहुबली 2'चा विक्रम मोडण्यासाठी फक्त 11कोटींची गरज

 Ramayana Movie Box Office: रणबीर कपूरचा रामायण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड ब्रेक करीत आहे. बॉक्स ऑफिसवर अल्लू

रक्षकच चोर निघाले! पोलीस आणि DRI कर्मचाऱ्यांनी सोनाराच्या सोन्यावर डोळा; अन् पुढे...

लखनौ: उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमध्ये कायदा- सुव्यवस्थेला आणि खाकी वर्दीला काळिमा फासणारी एक

Ashwini Vaishnaw : ‘आज एक दिवा बंद केला, उद्या मंदिरेच बंद करणार का?’; तमिळनाडूतील ‘दीपम’ वादावरून अश्विनी वैष्णव यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

चेन्नई : तमिळनाडूमध्ये पारंपारिक ‘दीपम’ (दिवा) पेटवण्यावर घातलेल्या बंदीवरून केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी

Mumbai Coastal Road: कोस्टल रोडवरील वरळी जेट्टी परिसरात उभारणार हेलिफॅड

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) वरील, वरळी