
Accident News : उत्तर प्रदेशातील बलरामपूर-बहराइच मार्गावर शनिवारी पहाटे भीषण अपघात घडला. भरधाव कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. या अपघातात कारमधील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची १४ वर्षांचा मुलगा आणि ७ वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. कोतवाली देहात परिसरातील कल्ला भट्टा जवळ ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील बेतिया येथील अखिलेश कुमार अविनाशी हे पत्नी पूनम, मुलगा दिव्यांश आणि मुलगी निष्ठा यांच्यासह लखीमपूर येथे लग्नसमारंभासाठी गेले होते. लग्नसमारंभ आटोपून कुटुंब कारने घरी परतत असताना पहाटेच्या सुमारास त्यांची कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.
नोव्हेंबर महिना संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असून, डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून सर्वसामान्यांच्या दैनंदिन खर्चावर परिणाम करणारे अनेक ...
या दुर्घटनेत अखिलेश कुमार आणि त्यांच्या पत्नी पूनम यांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन्ही मुलं गंभीर जखमी झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी मुलांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, जखमी मुलगी निष्ठा हिने दिलेल्या माहितीनुसार, २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या मावशीच्या लग्नासाठी ती आजोळी गेली होती. शनिवारी पहाटे चारच्या सुमारास कुटुंबीयांसोबत ती परतीच्या प्रवासाला निघाली होती. मात्र, अपघातानंतर तिला पुढील काहीच आठवत नसल्याचे तिने सांगितले. पोलिसांनी कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे





