Jalgaon : दात कोरताना सेफ्टी पिन थेट पोटात गेली अन्... जळगावमध्ये 18 वर्षीय तरुणीसोबत धक्कादायक घटना

Jalgaon : जेवण झाल्यानंतर दातांमध्ये अडकलेले अन्नकण काढण्यासाठी अनेकजण हातात मिळेल त्या वस्तूचा वापर करतात. मात्र, ही सवय किती धोकादायक ठरू शकते, याचा प्रत्यय जळगावमधील एका घटनेतून आला आहे. दात कोरताना एका १८ वर्षीय तरुणीने चुकून सेफ्टी पिन गिळली. ही पिन तिच्या अन्ननलिकेत अडकल्याने कुटुंबीयांची घाबरगुंडी उडाली. मात्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून पिन बाहेर काढली आणि तरुणीला मोठ्या संकटातून वाचवले.



नेमकी घटना काय ?


मिळालेल्या माहितीनुसार, जळगावमधील ही १८ वर्षीय तरुणी दात कोरण्यासाठी सेफ्टी पिनचा वापर करत होती. याचवेळी चुकून तिच्या हातातून पिन घशातून अन्ननलिकेत गेली. टोकदार पिन अन्ननलिकेत अडकल्याने तरुणीला त्रास होऊ लागला. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले.



डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करत काढली पिन


तरुणीच्या अन्ननलिकेत टोकदार वस्तू अडकल्याने डॉक्टरांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. जळगावच्या (Jalgaon) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कान, नाक व घसा विभागाच्या डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. अत्यंत सावधगिरीने शस्त्रक्रिया करत अन्ननलिकेत अडकलेली सेफ्टी पिन बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले. यामुळे तरुणीला मोठा दिलासा मिळाला. या यशस्वी उपचारासाठी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर यांच्यासह वैद्यकीय पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.






दात टोकरताना कोणती काळजी घ्यावी ?


दातांमध्ये अडकलेले अन्नकण काढण्यासाठी पिन, सुई, खिळे किंवा इतर टोकदार वस्तूंचा वापर करू नये. अशा वस्तूंमुळे हिरड्यांना जखम होण्यासोबतच गंभीर इजा होण्याचा धोका असतो.


डेंटल फ्लॉस वापरा : दातांमधील अन्नकण काढण्यासाठी डेंटल फ्लॉस हा सुरक्षित पर्याय आहे.


इंटरडेंटल ब्रशचा वापर करा: दातांमधील मोकळी जागा स्वच्छ करण्यासाठी योग्य आकाराचा ब्रश वापरावा.


हळुवारपणे स्वच्छता करा: फ्लॉस किंवा ब्रश वापरताना हिरड्यांवर जास्त दाब देऊ नये.


स्वच्छतेची काळजी घ्या: प्रत्येक दातांमधील जागा स्वच्छ करताना फ्लॉसचा स्वच्छ भाग वापरावा.


जळगावमधील या घटनेमुळे दात टोकरण्याच्या साध्या वाटणाऱ्या सवयीमधील धोका समोर आला आहे. त्यामुळे दात स्वच्छ करण्यासाठी कोणत्याही टोकदार वस्तूचा वापर टाळण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

Comments
Add Comment

Germany Strange Rules: बागेत बाकावर बसून रडणाऱ्या महिलेला दंड! जर्मनीतील अजब नियम चर्चेत

Germany Strange Rules: कधीकधी, आपण एकटे असतो, अस्वस्थ वाटत असते, तेव्हा कोणाशीतरी बोलण्याऐवजी थोडा वेळ एकटे बसावेसे वाटते.

AI मुळे 2027 मध्ये कोरोनापेक्षाही मोठं संकट ? संशोधकाचा गंभीर इशारा

AI : कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (AI) अनेक कामं सोपी आणि वेगवान झाली आहेत. अवघ्या काही सेकंदांत तासन्तास लागणारी कामं

E85 इंधनावर चालणार टोयोटाची इनोव्हा! भारतातील पहिली फ्लेक्स-फ्यूएल हायब्रीड कार लॉन्च

Toyota Innova Hycross: भारतातील पहिली फ्लेक्स-फ्यूएल हायब्रीड कार टोयोटाने, इनोव्हा हायरायडर लॉन्च केली आहे. ही एमपीव्ही E20

Nashik : दुष्काळाचे संकट ओळखून प्रशासनाचा ‘अलर्ट मोड’

नाशिक : संभाव्य दुष्काळाचे आव्हान लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच सज्ज राहावे. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची

Accident News : लग्नाहून परतताना काळाचा घाला ! कारचा भीषण अपघात, पती-पत्नी ठार

Accident News  : उत्तर प्रदेशातील बलरामपूर-बहराइच मार्गावर शनिवारी पहाटे भीषण अपघात घडला. भरधाव कार रस्त्याच्या कडेला

Rule Change 1st December: LPG पासून क्रेडिट कार्डपर्यंत...! 1 डिसेंबरपासून बदलणार 5 मोठे नियम; थेट तुमचा खिशावर परिणाम

नोव्हेंबर महिना संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असून, डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून सर्वसामान्यांच्या