
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा वापर दिवसेंदिवस वाढत असताना त्याच्या गैरवापराबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेषतः लहान मुलांच्या ऑनलाइन सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. चिनी कंपनी MiniMax च्या 'Talkie' या AI चॅटबॉट अॅपवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या अॅपमधील AI पात्रे मुलांशी आक्षेपार्ह आणि अयोग्य स्वरूपात संवाद साधत असल्याचे एका तपासात समोर आले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत Apple ने जगभरातील App Store मधून Talkie अॅप हटवले आहे.(AI Chatbot)
काय आहे Talkie अॅप?
Talkie हे एक AI कम्पॅनियन अॅप आहे. या अॅपच्या माध्यमातून वापरकर्त्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेने तयार केलेल्या वेगवेगळ्या पात्रांशी संवाद साधता येतो. या पात्रांशी टेक्स्ट आणि व्हॉइसच्या माध्यमातून गप्पा मारता येतात. काही पात्रे मैत्रीपूर्ण, तर काही रोमँटिक साथीदाराच्या स्वरूपात तयार करण्यात आली आहेत. मात्र, याच सुविधेचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.(AISafety)
उपराजधानी नागपुरात गुन्हेगारीच्या घटनांमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. एमडी ड्रग्सच्या कथित तस्करीच्या वादातून कुख्यात गुंडाच्या साथीदारावर पाच ...
मुलांशी अयोग्य संवाद झाल्याचा धक्कादायक खुलासा
ऑस्ट्रेलियातील ABC News आणि ब्रिटनमधील The Bureau of Investigative Journalism यांनी संयुक्त तपास केला. या तपासात काही पालकांनी आपल्या मुलांच्या Talkie वरील संवादांबाबत चिंता व्यक्त केल्याचे समोर आले. काही AI पात्रांकडून मुलांशी आक्षेपार्ह, अपमानास्पद आणि अयोग्य स्वरूपाचा संवाद साधला जात असल्याचे तपासात आढळले.(Child Safety)
विशेष म्हणजे, एका पालकाला आपल्या 12 वर्षीय मुलीच्या AI पात्रासोबतच्या संवादामध्ये अपमानास्पद आणि मानसिक त्रास देणारे संदेश आढळले. अमेरिकेतील एका पालकानेही आपल्या 10 आणि 13 वर्षांच्या मुलींच्या अॅपवरील संवादांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली होती.
18 वर्षांवरील वापरासाठी असतानाही मुलांकडून वापर
Talkie अॅपला 18 वर्षांवरील वापरकर्त्यांसाठीचे रेटिंग देण्यात आले होते. तरीही अनेक अल्पवयीन मुले या अॅपचा वापर करत असल्याचे तपासात समोर आले. काही देशांमध्ये वयाची अट असतानाही वय पडताळणीची प्रक्रिया पुरेशी प्रभावी नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.(OnlineSafety)
नाशिक : तुमच्या वाहनाला अजूनही एचएसआरपी नंबर प्लेट बसवलेली नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण एचएसआरपी नंबर प्लेट न बसवणाऱ्या ...
Apple ची जगभरात मोठी कारवाई
या संपूर्ण प्रकरणानंतर Apple ने Talkie अॅप आपल्या App Store मधून जगभरात हटवले. अॅपमध्ये लैंगिक स्वरूपाचा आक्षेपार्ह मजकूर असल्याचे कारण Apple कडून देण्यात आले. मात्र, Apple ने ही कारवाई नेमक्या कोणत्या विशिष्ट संवादांमुळे केली, याबाबत सविस्तर स्पष्टीकरण दिलेले नाही.(Apple)
दरम्यान, वृत्त प्रसिद्ध झाले त्यावेळी हे अॅप Google Play Store वर उपलब्ध असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले होते. त्यामुळे केवळ एका अॅपवर कारवाई करून प्रश्न सुटणार नाही, तर AI आधारित प्लॅटफॉर्मवर मुलांच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रभावी नियमांची आवश्यकता असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
AI अॅप्सच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
या घटनेमुळे AI कम्पॅनियन अॅप्सच्या वापराबाबत जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. मुलांना AI तंत्रज्ञानाची ओळख करून देताना त्यांच्यासाठी योग्य वयोमर्यादा, सुरक्षित संवाद आणि प्रभावी वय पडताळणी असणे आवश्यक आहे. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी मुलांच्या सुरक्षिततेशी तडजोड होता कामा नये, हा मुद्दा या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाला आहे.(App Removed)






