Home महामुंबई ठाणे एसटीच्या धडकेत कारमधील दोघे ठार

एसटीच्या धडकेत कारमधील दोघे ठार

0
संग्रहित छायाचित्र

टोकावडे गावाजवळील कल्याण-माळशेजमार्गावर कार आणि एसटीच्या धडकेत कारमधील दोघे जण जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी घडली.

संग्रहित छायाचित्र

मुरबाड – टोकावडे गावाजवळील कल्याण-माळशेजमार्गावर कार आणि एसटीच्या धडकेत कारमधील दोघे जण जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी घडली.

अपघातात मृत्यूमुखी पडलेले दोघेही संगमनेर तालुक्यातील आहेत. याप्रकरणी टोकावडे पोलीस ठाण्यात एसटी बसच्या चालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्गावर अपघाताच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या गवतामुळे अवघड वळणावर समोरून येणारी वाहने दिसत नसल्याने अपघात घडत आहेत.

शनिवारी याच मार्गावर टोकावडे व मानिवलीच्या दरम्यानच्या वळणावर दुतर्फा वाढलेल्या गवतामुळे शहापूरहुन चिंचोलीकडे भरधाव जाणा-या एसटीची बस कारला धडक बसल्याने कारचालक दीपक खेमनार (३२ रा.आंबोरी, ता. संगमनेर) आणि सहप्रवासी सचिन गोसावी (३४ रा. निमज, ता.संगमनेर) हे दोघे जागीच ठार झाले. कारमधील इतर तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी बसचालक ज्ञानेश्वर संघशेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version