Home शिकू आनंदे काळ्या सोन्यातील सुवर्णमय करिअर

काळ्या सोन्यातील सुवर्णमय करिअर

0

पेट्रोलियम उत्पादनं ही प्रत्येक देशासाठी बहुमूल्य असून ती एकप्रकारे राष्ट्रीय संपत्तीच असते. पेट्रोलियमचा आणि पेट्रोलियम उत्पादनांचा वापर आणि गरज दिवसेंदिवस वाढतच आहे. पेट्रोल, डिझेल, खनिज तेल, घरगुती गॅस, सीएनजी अशी कितीतरी उत्पादनं मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील तज्ज्ञांची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे या क्षेत्रात येणा-यांना जगभर मागणी आहे.

पेट्रोलियम उत्पादनं, खनिज तेल म्हणजे कुठल्याही देशासाठी अतिशय मौल्यवान वस्तू बनली आहे. कच्च्या तेलाच्या रूपातील ही संपत्ती मिळण्यासाठी सर्वच देशांत चढाओढ लागलेली दिसून येते. ज्या देशाकडे ही संपत्ती अधिक, तो देश अधिक बलवान अशी काहीशी परिस्थिती दिसून येत आहे. थोडक्यात, पेट्रोलियम उत्पादनांना जगभरातून मोठी मागणी आहे. परंतु पृथ्वीच्या पोटातून पेट्रोलियमचा शोध घेणं सोपं मुळीच नाही. हे अतिशय किचकट आणि आव्हानात्मक काम आहे. म्हणूनच पेट्रोलियम खनिजं शोधणं, त्यापासून शुद्ध पेट्रोल बनवणं, ते साठवून ठेवणं इत्यादी सर्व बाबींसाठी व्यावसायिक प्रशिक्षितांची गरज मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. हे आव्हानात्मक काम स्वीकारण्यासाठी पेट्रोलियम इंजिनीअर्सना सध्या खूप मागणी आहे. 

पेट्रोलियम इंजिनीअर हे जगभरातील निरनिराळ्या ठिकाणांचा शोध घेऊन नैसर्गिक तेल आणि वायू यांच्या खाणी शोधून काढतात. हे इंजिनीअर्स तेलाचे आणि वायूंचे संशोधन आणि निर्मिती करण्याचं महत्त्वाचं काम करतात. या अभियंत्यांना प्रात्यक्षिक काम कसं करावं याचं वैज्ञानिक ज्ञान असतं. त्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या विषयांचं सखोल ज्ञान असणं गरजेचं असतं. पेट्रोलियम इंजिनीअरिंग हे भूगर्भशास्त्राच्या मुलभूत ज्ञानाशी, भौतिकशास्त्राशी, तसंच पेट्रोलियमचा प्रक्रिया विधी या सर्व गोष्टींशी निगडित आहे. हे क्षेत्र म्हणजे मूलत: मायिनग इंजिनीअरिंग हेच असून केवळ तेल आणि गॅस (वायू) यांच्याशीच संबंधित आहे.

कामाची व्याप्ती:-

पेट्रोलियम इंजिनीअरच्या कामाची व्याप्ती बरीच मोठी आहे. नसर्गिक खनिज स्रेत शोधणं, त्यातील खनिजांच्या नसर्गिक गुणधर्माची तपासणी करणं आणि पेट्रोलियम खनिजं वेगळी करण्यासाठी आणि शुद्ध करण्यासाठी आधुनिक यंत्रसामग्रीची निर्मिती करणं, नसíगक खनिजसाठा सापडल्यानंतर पेट्रोलियम इंजिनीअरचं काम खऱ्या अर्थानं सुरू होतं. एखादा साठा शोधल्यानंतर ते भूगर्भशास्त्र तज्ज्ञ, जीवभौतिकशास्त्र तज्ज्ञ आणि इतर भूगर्भतज्ज्ञांसोबत काम करतात. त्यात भूस्तर कोणत्या प्रकारच्या खडकांनी बनला आहे, त्यासाठी कोणत्या प्रकारचं खोदकाम करणं उपयुक्त आहे, त्या पद्धतीवर लक्ष ठेवणं आणि ते खोदकाम योग्यप्रकारे होत आहे का हे पाहणं.., या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवत असतात. याबरोबरच पेट्रोलियम इंजिनीअर हे वेगवेगळ्या उपकरणांचं डिझाइन बनवणं तसंच कमीत कमी श्रमात अधिकाधिक खनिजं कशी मिळतील यासाठीही प्रयत्न करत असतात. यासाठी ते संगणकाचा वापर मोठय़ा प्रमाणात करतात. पुढचा साठा सापडण्याची शक्यता कुठे आहे हे देखील तपासतात.

पेट्रोलियम इंडस्ट्री ही मुख्यत: दोन भागात विभागली गेली आहे. एक अपस्ट्रीम सेक्टर आणि दुसरा डाऊनस्ट्रीम सेक्टर. अपस्ट्रीम सेक्टरमध्ये खाणींचा शोध, उत्पादन निर्मिती आणि त्यापासून तेल आणि नसर्गिक गॅस वेगळे करणं.. ही कामं समाविष्ट असतात, तर डाऊन स्ट्रीममध्ये खनिज तेल स्वच्छ करणं, वितरण, विपणन (डिस्ट्रीब्युशन आणि मार्केटिंग) इत्यादी कामांचा समावेश असतो. मोठमोठे कारखाने, गाडय़ा आणि घरगुती उपकरणं सारेच पेट्रोलियम उत्पादनांवर अवलंबून असतात. ही उत्पादनं नसती तर माणूस पुन्हा अश्मयुगात गेला असता. थोडक्यात, पेट्रोलियम हा एक जादूचा पदार्थ असून वाहतूक, यंत्रसामग्री, घराघरातील स्वयंपाक सारं काही यावरच अवलंबून आहे. म्हणूनच पेट्रोलियम इंजिनीअर्स तज्ज्ञांची जगभरात खूप मोठी मागणी असल्याचं दिसतं. हे एक आव्हानात्मक क्षेत्र असून आपण त्यामध्ये खूप प्रगती करू शकतो. पेट्रोलियम इंजिनीअर म्हणून काम करताना बुद्धीसोबतच कष्टाचं काम करणंही गरजेचं असतं. या काळ्या सुवर्णातून मग एक सोनेरी करिअर निर्माण होऊ शकतं.

भूगर्भशास्त्राच्या मूलभूत सिद्धांतात या क्षेत्राची मुळं रुजली असून इतर अनेक शाखांना ती स्पर्श करतात. म्हणूनच तेलसाठे, वायूसाठे शोधणं त्यांचं शुद्धीकरण करणं, नंतर ते वाहून नेणं, घाऊक बाजारात वितरित करणं अशा अनेक शाखा यामध्ये दिसून येतात. यापैकी आपल्या आवडत्या शाखेत विशेष प्रावीण्य मिळवता येतं.
केवळ इंधन म्हणून नव्हे तर प्लास्टिक निर्मिती, पेंट्स तयार करणं, पॉलिमर्स बनवणं, साबण बनवणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे औषधनिर्मितीमध्ये पेट्रोलियम उत्पादनांचा महत्त्वाचा वाटा असतो. सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पेट्रोल, डिझेल तसंच घरगुती वापरासाठी एल.पी.जी. किंवा रॉकेल अशा विविध रूपात ते वापरले जातात. तसंच गॅसोलाईन, बीटूमेन, बुनकट ऑईल, एव्हिएशन टर्बाईन फ्युराज, सी. एन. पी. मिनरल ऑईल, पेट्रोलियम जेली, लुब्रीकंट्स इत्यादी कितीतरी प्रकारात पेट्रोलियम वापरलं जातं. सर्वच उद्योगधंदे, कारखाने यांवर अवलंबून असल्यानं पेट्रोलियम हे प्रत्येक देशाची राष्ट्रीय संपत्ती म्हणून ओळखलं जातं.

शैक्षणिक अर्हता:-

पेट्रोलियम इंजिनीअर होण्यासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित या विषयांतून बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. बारावीनंतर या विषयात पदवी घेता येते. बी.टेक्, बी.एड. (केमिकल पेट्रोलिअम) उत्तीर्ण झालेले उमेदवार या विषयात पदव्युत्तर म्हणजे एमटेक करू शकतात. तसंच जिऑलॉजी किंवा जिओफिजिक्स या विषयांत एमएस्सी ५५ टक्के गुणांनी उत्तीर्ण झालेले उमेदवारही एमटेक् या अभ्यासक्रमासाठी पात्र ठरू शकतात.

पेट्रोलियम इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाच्या प्रमुख संस्था:-

डिब्रुगड युनिव्हर्सिटी आसाम (www.dibru.ernet.in.) इंडियन स्कूल ओपन माइन्स, धानबाड, झारखंड (www.ismdhanbad.ac. in.)इन्स्टिटय़ूट ऑफ केमइन्फम्रेटिक्स स्टडीज, नोएडा ( www. cheminformaticscentre.org)महाराष्ट्र इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे (www.imtpune.com.) एन. वाडिया कॉलेज, पुणे (www. petroleum technology. net.)युनिव्हर्सिटी ऑफ पेट्रोलियम स्टडिज, डेहराडून (www. upsindia.ong.)नागपूर, युनिव्हर्सिटी, नागपूर (www.napuruniversicty.org)

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version