Home महामुंबई ठाणे घरगुती गणेश सजावट स्पर्धा व्हॉट्सअ‍ॅपवर

घरगुती गणेश सजावट स्पर्धा व्हॉट्सअ‍ॅपवर

1

ठाण्यात गणेशोत्सवात थेट घरगुती गणपती सजावटीसाठी चक्क व्हॉट्सअ‍ॅपवर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

ठाणे- सध्याच युग हे इंटरनेटच आहे. त्यातही सोशल मिडीयाचा वापर सर्वत्र जोरदार सुरू आहे यात व्हॉट्सअ‍ॅपमुळे तर संपूर्ण जगच एकमेकांशी जुळले गेले आहे. त्याचाच आधार घेत आता ठाण्यात गणेशोत्सवात थेट घरगुती गणपती सजावटीसाठी चक्क व्हॉट्सअ‍ॅपवर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

त्यामुळे  परिक्षकांना आता   घरोघरी जाऊन परीक्षण करण्याची गरज भासणार नाही. केवळ एक फोटो पाठवून या स्पर्धेत बाप्पांच्या भक्तांना सहभागी होता येणार आहे

लाडक्या गणरायाचे आगमन आत्ता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले आहे.  बाप्पा घरी येणार म्हणून गेल्या काही दिवसापासून सर्वत्र जोरदार तयारी सुरु आहे. त्यातही प्रत्येकजण आपल्या घरातील गणपतीसाठी तर विशेष सजावट करण्याची तयारी करत आहे कोणी फुलांची आरास तयार करत आहे. कोणी पर्यावरणप्रेमी मखर बनवत आहे.

कोणी सुंदर देखावे तयार करत आहे. प्रत्येकजण आपआपल्या परीने या उत्सवाची तयारी करत आहे. अशा सजावटीचे कौतुक करण्यासाठी दरवर्षी विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्ष हे घरगुती गणपती सजावट स्पर्धा आयोजित करत असतात. विविध क्षेत्रातील मान्यवर परीक्षक घरोघरी जावून गणपती सजावटीच परीक्षण करतात.

यंदा अशा परिक्षणासाठी त्यांना घरी जाण्याची गरज भासणार नाही.  त्याला कारण आहे यंदा चक्क प्रथमच ठाण्यातील गोकुळनगर परिसरात व्हॉटसअप घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याकरिता या स्पर्धेत भाग घेणा-या व्यक्तींना आपल्या गणपतीचा फोटो मोबाईलवर पाठवावा लागणार आहे संस्कार प्रतिष्ठान आणि मनसेचे ठाणे विभागीय सचिव प्रदीप सावर्डेकर यांच्या संयुक्त विद्यमाने या आगळा वेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल आहे.

याकरिता या संस्थेने ८०८०५५५३९९ हा व्हॉट्सअ‍ॅप  क्रमांक सुरु केला आहे. या क्रमांकावर गोकुळनगर येथील नागरिकांनी आपल्या गणपतीचे आणि सजावटीचे फोटो आणि आपले नाव संपूर्ण पत्ता पाठवायचा आहे. अशाप्रकारे या क्रमांकावर आलेल्या या फोटोंच विविध क्षेत्रातील मान्यवरव्यक्तींकडून परीक्षण केले जाणार आहे.

त्यातून दहा गणपतींची निवड करण्यात येणार आहे. आहे.  सध्या घरोघरी गणपती उत्सव मोठय़ा प्रमाणात साजरे  करण्यात येत आहेत.  अशावेळी परिक्षकांना एकाचवेळी अनेक ठिकाणी जाणे शक्य होत नाही. म्हणून या स्पर्धेचे थेट व्हॉट्सअ‍ॅपवर आयोजन करण्याचे आम्ही ठरवले आहे. त्यामुळे जास्तीत -जास्त लोक यात सहभागी होऊ शकतील असे सावर्डेकर यांनी सांगितले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version