Home एक्सक्लूसीव्ह डोंबिवलीकर स्त्री शक्तीने महिला बॅँकेचे हात बळकट

डोंबिवलीकर स्त्री शक्तीने महिला बॅँकेचे हात बळकट

1

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या भारतीय महिला बॅँकेत खाते उघडण्यासाठी डोंबिवलीकर स्त्रीशक्तीने बुधवारी जोरदार प्रतिसाद दिला. 

डोंबिवली – महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या भारतीय महिला बॅँकेत खाते उघडण्यासाठी डोंबिवलीकर स्त्रीशक्तीने बुधवारी जोरदार प्रतिसाद दिला. या बॅँकेत एका दिवसात सुमारे पाचशे महिलांनी खाते उघडले. डोंबिवलीत या बॅँकेची लवकरच शाखा सुरू करण्यात येईल, असे संकेत बँकेच्या अधिकारी धनश्री संभूस यांनी येथे दिले.

रयत राज्य श्रमिक महासंघ घरकामगार संघटनेच्या पुढाकाराने पालिकेच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागहात महिलांचा मेळावा झाला. या वेळी बँकेचे अधिकारी संभूस, राहूल रंजन आदींनी महिलांना मार्गदर्शन केले. ‘बँक आपल्या दारी’ या उपक्रमा अंतर्गत बँकेने महिलांना खाते उघडण्याच्या फायद्यांची माहिती दिली.

रेशन कार्ड, पॅन कार्ड, आधारकार्ड व एक हजार रुपये घेऊन महिलांचे बँकेत खाते उघडले. भारतीय महिला बँकेतर्फे खातेदार बनलेल्या महिलांचे बचत गट तयार करण्यात येणार आहेत. त्यांना उद्योगासाठी कर्ज व भांडवल दिले जाईल, असेही संभूस यांनी सांगितले.

मुंबईत पहिल्या भारतीय महिला बँकेची स्थापना नुकतीच झाली. या बॅँकेत दोन हजार महिलांनी खाते उघडले आहे. या बॅँकेच्या ३१ मार्चपर्यंत १६ शाखा उघडण्यात येणार आहेत. संघटनेचे संस्थापक राजुभाऊ धुरदेव यांनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला.

1 COMMENT

  1. शासनाचा ही योजना अत्यंत उपयोगी ठरणार आहे, ग्रामीण भागात या योजणेची जास्त गरज आहे त्या मुळे ग्रमीण महीला स्वालंबी होउन त्यांना जगण्याची नवी दिशा मिळीळ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version