Home महामुंबई ठाणे चिमुकलीच्या मृत्यूमुळे डोंबिवलीत खळबळ

चिमुकलीच्या मृत्यूमुळे डोंबिवलीत खळबळ

0

डोंबिवली येथील खासगी रुग्णालयाच्या आवारात पाच दिवसांची एक मुलगी मृतावस्थेत आढळली.


डोंबिवली- डोंबिवली येथील खासगी रुग्णालयाच्या आवारात पाच दिवसांची एक मुलगी मृतावस्थेत आढळली. या बाळाला इमारतीच्या दुस-या मजल्यावरून फेकून दिल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आल्याने डोंबिवलीत एकच खळबळ उडाली.

डोंबिवलीतील फतेह अली रोडवरील शुभदा रुग्णालयात दाखल झालेल्या सुजाता गायकवाड (२१) यांनी मागील शनिवारी एका मुलीला जन्म दिला होता.

आई आणि मुलीची प्रकृती उत्तम होती. आई आणि बाळ दोघेही रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. त्यांना रुग्णालयातून लवकरच सुटीही मिळणार होती.

बाळाच्या आईने दिलेल्या माहितीनुसार बाळ पाळण्यात असताना त्या दात घासण्यासाठी बाथरुममध्ये  गेल्या होत्या. तर त्यांची सासू व अन्य नातेवाईक नास्ता करण्यासाठी वॉर्डाबाहेर गेले होते. मात्र, बेडवर आल्यावर त्यांना त्यांचे बाळ आढळले नाही. त्यांनी जवळपासच्या रुग्णांकडे व कर्मचा-यांकडे विचारणा केली.

या दरम्यान, रुग्णालयाच्या आवारात एक बाळ पडले असल्याची माहिती एका रुग्णसेविकेने रुग्णालयाच्या अधिका-यांना दिली. डॉ. हर्षदा प्रधान यांनी तातडीने धाव घेऊन बाळाची तपासणी केली असता ते मृत झाल्याचे स्पष्ट झाले.

या रुग्णालयाचे वॉर्डच्या खिडक्या ग्रीलने बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बाळाला रुग्णालयाच्या गच्चीवरून फेकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. रामनगर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृत अर्भक विच्छेदानासाठी पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात नेले असून तूर्तास अकस्मित मृत्यू अशी नोंद केली आहे.

बाळाच्या आई शुभदा यांचे पती दत्ता गायकवाड यांनी बाळाच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी केली आहे. सुजाता यांची तपासणी केल्यावर त्यांना मुंबईतील शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, स्थिती गंभीर असल्याने आम्ही नंतर त्यांना शनिवारी दाखल करून घेतले. त्यांचे सिझेरियन करण्यात आले.

आई व बाळ सुखरुप होते. गुरुवारी सकाळी या दोघांनाही रुग्णालयातून सुटी मिळणार होती. मात्र, ही घटना घडली. मागील २० वर्षात रुग्णालयात अशी घटना घडली नव्हती. असे रुग्णालयातील  डॉ. पुष्कर प्रधान यांनी सांगितले.

सुजाता गायकवाड यांना हॉस्पिटलमध्ये शनिवारी रात्री तातडीने उपचार मिळावेत म्हणून दाखल केले होते. घटना घडली तेव्हा बालिकेच्या दोन्ही आज्या हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये उपस्थित होत्या.

या शिवाय अन्य चार महिला पेशंट आणि त्यांचे नातेवाईकही होते. सात जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत व तूर्तास अकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. याबाबतचा तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिवरकर यांनी सांगितले. मात्र या घटनेमुळे या डोंबिवलीत खळबळ उडाली आहे.

रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत

दीड वर्षापूर्वी राज्यात घडत असलेल्या स्त्रीभ्रूण हत्येच्या घटनेनंतर सरकारने खासगी रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबतचे आदेश दिले होते. मात्र, शुभदा रुग्णालयात असे कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे हे बाळ कुणीच चोरण्याच्या प्रयत्नात फेकून दिले किंवा या घटनेमागे स्त्रीभ्रूण हत्येचा प्रकार आहे का, हे याचा तपास करणे पोलिसांना आव्हान ठरणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version