Home टॉप स्टोरी मसरत आलमवर लक्ष ठेवू – राजनाथ

मसरत आलमवर लक्ष ठेवू – राजनाथ

1

मसरत आलमच्या अटकेसाठी कोणतेही ठोस कारण नसल्याने पुन्हा त्याच्या अटकेचे आदेश देता येणार नाहीत असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी सभागृहाला सांगितले.

नवी दिल्ली – मसरत आलमच्या अटकेसाठी कोणतेही ठोस कारण नसल्याने पुन्हा त्याच्या अटकेचे आदेश देता येणार नाहीत असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी सभागृहाला सांगितले.

मसरत आलमच्या वादग्रस्त सुटकेसंबंधी संसदेच्या दोन्ही सभागृहात निवेदन करताना गृहमंत्री म्हणाले की, आलमची सुटका झाली असली तरी, त्याच्यावर आणि त्याच्या सहका-यांवर लक्ष ठेवले जाईल.

विरोधी पक्षांनी बुधवारी केंद्र सरकारवर मसरत आलमच्या सुटका प्रकरणात दिशाभूल करत असल्याचा आरोप केल्यानंतर गृहमंत्र्यांनी गुरुवारी निवेदन केले.

जम्मू-काश्मीरमध्ये केंद्रीय राजवट असताना फेब्रुवारीमध्ये मसरत आलमच्या सुटकेचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे आलमच्या सुटकेपूर्वी जम्मू-काश्मीर सरकारने केंद्राशी चर्चा केली नाही असे सांगून केंद्र सरकार दिशाभूल करत आहे असा आरोप विरोधी पक्षांनी केला होता.

1 COMMENT

  1. कारगिल घडले तेव्हा लक्ष्य कुठे होते.? गांधीजींकडे. जय श्री राम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version