Home महामुंबई ठाणे मिरा-भाईंदर महापालिका महापौरपदी गीता जैन!

मिरा-भाईंदर महापालिका महापौरपदी गीता जैन!

0

मिरा-भाईंदर महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीआधी शिवसेना-भाजपने मांडलेल्या घोडेबाजारात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नगरसेवक फुटल्याने पहिल्यांदाच भाजपचा महापौर; तर शिवसेनेचा उपमहापौर निवडून आला आहे.

भाईंदर – मिरा-भाईंदर महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीआधी शिवसेना-भाजपने मांडलेल्या घोडेबाजारात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नगरसेवक फुटल्याने पहिल्यांदाच भाजपचा महापौर; तर शिवसेनेचा उपमहापौर निवडून आला आहे.

सत्ता व संपत्तीच्या बळावर भाजपने राष्ट्रवादीच्या वंदना मंगेश पाटील व परशुराम म्हात्रे या दोघा नगरसेवकांना पक्षात घेतले होते. ऐन निवडणुकीआधीच राष्ट्रवादीचे नगरसेवक अशोक तिवारी यांच्यासह मेहरुन्नीसा सुंबड यांना भाजपने फोडले. त्यामुळे बहुजन विकास आघाडीच्या तिघा नगरसेवकांनीदेखील युतीसोबतच राहणे पसंत केले.

परिणामी शक्रवारी झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या गीता जैन महापौरपदी; तर शिवसेनेचे प्रवीण पाटील उपमहापौरपदी विराजमान झाले आहेत. जैन व पाटील यांना प्रत्येकी ४८ मते पडली. तर राष्ट्रवादीच्या महापौरपदाच्या उमेदवार कॅटलिन परेरा व काँग्रेसचे उपमहापौरपदाचे उमेदवार हंसुकुमार पांडे यांना प्रत्येकी ४१ मते मिळाली.

सत्तेच्या समीकरणात महत्त्वाची भूमिका असलेल्या ‘बविआ’च्या हाती भोपळाच आला आहे. निदान सव्वा वर्ष तरी महापौर पद द्यावे, अशी स्थानिक बविआची अपेक्षा फोल ठरली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version