Home ऐसपैस वसई प्रांताच्या गतकाळाचा शोध

वसई प्रांताच्या गतकाळाचा शोध

1

शिलाहारांच्या राजवटीनंतर यादव राजवंश घराण्यांनी उत्तर कोकणावर साम्राज्य स्थापनेचा प्रयत्न केला. देवगिरीचा भीषण पराभव झाल्याने ठाणे व उत्तर कोकणात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. 

शिलाहारांच्या राजवटीनंतर यादव राजवंश घराण्यांनी उत्तर कोकणावर साम्राज्य स्थापनेचा प्रयत्न केला. देवगिरीचा भीषण पराभव झाल्याने ठाणे व उत्तर कोकणात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. याच गोंधळलेल्या परिस्थितीत गुजरातच्या पाटण अनहिळवाड येथील प्रतापबिंब नामक राजाने ठाणे- कोकणावर विजय मिळवत माहीम येथे राजधानी स्थापन केली.

महिकावतीच्या बखरीप्रमाणे शक १०६० मधील प्रतापबिंबाच्या आगमनापासून शक १४६० च्या सुमारास झालेल्या राजकीय बदलांची पार्श्वभूमी लक्षात येते. ‘महिकावतीची बखर’ हा मध्ययुगीन उत्तर कोकण व ठाणे प्रातांच्या इतिहासाची साक्ष आहे. बखरीतील नद्यांची नावे, ग्रामनामे यांचा वेध घेणे प्रामाणिक इतिहास संशोधनाची दीर्घ वाटचाल आहे. सोपारे हे नाव शिलालेखातून व ताम्रपटांतून शुर्पारक असे नमुद करण्यात आलेले आहे. मूळ नाव सौपर्यम्. सुपरिणा निवृत्तं नगरं सौपर्यम्. सुपरि नामक एक व्यक्ती त्याने वसवलेले जे नगर ते सौपर्यम. सौपर्यम्चा अपभ्रंश सोपारें असा होत गेला.

दमण, नळें मोरे, मोरकुरण, केरौली, आंधेरी इत्यादी ग्रामनामांवरुन आर्याचा अथवा आर्यसमांच्या वसाहती उत्तर कोकणात दामणीय नल मौर्य अंधक कोख्य इत्यादी लोकांनी केला, यातील गुहाशय, कातवडी, नाग वारली, कोळी, ठाकर, दमनीय महाराष्ट्रीय सातवाहन, आंध्र मांगेले, नल मौर्य, त्रकुटक, शिलाहार, चालुक्य राष्ट्रकुट, चालुक्य यांचा वेध व इतिहास आजही अभ्यासकांना आव्हान आहे.

शुर्पारक नगरी भगवान परशुरामाची कर्ममूभी मानण्यात येते. परंतु ही कोकणाची राजधानी मानण्यात येते. शुर्पारक ऊर्फ सोपारा बंदराचा इ. स. पूर्व २५०० ते इ. स. पूर्व ५०० कालखंडात इजिप्त बाबिलोन देशांबरोबर असणारा व्यापारी संबंध लक्षात घेणे गरजेचे आहे. वसई हा शब्द संस्कृत भाषेतील मूळ क्रियापद वस म्हणजे राहणे वस्ती करणे यातून निर्माण झाला आहे. यातच प्राचीन संदर्भ जपणारी आगाशी बोळींज, नाळ, गास, निर्मळ गावे आहेत. यात असंख्य तीर्थाचा, तलावांचा अज्ञात इतिहास जपण्याची व संकलित होण्याची गरज आहे. परशुरामाने क्षत्रियांचा संहार केल्यावर सा-या जगतात चक्रतीर्थपद मिळवले. त्यानंतर त्यांनी सारी पृथ्वी ब्राह्मणांना दान केली व बाणाच्या साह्याने समुद्र हटवून नवभूमीची निर्मिती केल्याची कथा जनमाणसात दृढ आहे. परशुरामाच्या राजधानीचे स्थळ परशुरामभूमी सूरपूर नावाने ओळखले जाई.

1 COMMENT

  1. परशुरामाची भूमी नह्वे भन्ते पूर्ण ची भूमी आहे. खोटा इतिहास सांगू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version