Home विज्ञान तंत्रज्ञान संवादकौशल्य शिकवणारा संगणक

संवादकौशल्य शिकवणारा संगणक

1

संगणकामुळे सोशल नेटवर्किंगचे प्रमाण वाढले असले आणि मित्रपरिवार आणि नातेवाइकांमध्ये होणारा संवाद वाढला असला तरी समाजात वावरताना कसे वावरायचे, कोणाशी कसे बोलायचे याचे दडपण काहींना येत असते. 
संगणकामुळे सोशल नेटवर्किंगचे प्रमाण वाढले असले आणि मित्रपरिवार आणि नातेवाइकांमध्ये होणारा संवाद वाढला असला तरी समाजात वावरताना कसे वावरायचे, कोणाशी कसे बोलायचे याचे दडपण काहींना येत असते. विशेषत: ऑटिझम या विकाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना दुस-याशी संवाद साधताना अडचणी येत असतात. त्याच प्रकारे नोकरीसाठी मुलाखत देताना, एखाद्या कार्यक्रमात किंवा कार्यालयात मोठया समुदायासमोर बोलताना आणि अगदी प्रेमवीरांना त्यांच्या प्रेमिकेला प्रेमाची गळ घालतानाही भंबेरी उडत असते. अशा व्यक्तींना आत्मविश्वासाने समोरच्या व्यक्तीशी संवाद कसा साधावा, याचे प्रशिक्षण देणारा संगणक शास्त्रज्ञांनी विकसित केला आहे. ‘माक’ म्हणजेच ‘माय ऑटोमेटेड कन्व्हर्सेशन कोच’ असे या ‘प्रोग्राम’चे नाव असून ऑटिझममुळे ज्यांना समाजात मिसळण्याची भीती वाटते त्यांच्यासाठी हा प्रोग्राम उपयुक्त ठरू शकेल, असे शास्त्रज्ञांना वाटत आहे.

या प्रणालीमध्ये संगणकावर एक चेहरा तयार होतो. हा चेहरा संगणकासमोर बसलेल्या व्यक्तीशी चर्चा करू लागतो. यावेळी संगणकावर लावलेल्या वेब कॅमे-याद्वारे संगणकासमोरच्या व्यक्तीच्या चेह-यावरचे हावभाव टिपले जातात. त्याच प्रकारे त्या व्यक्तीची बोलण्याची शैली आणि त्याचे वागणे याचे अतिशय बारकाईने निरीक्षण केले जाते. 

ज्यावेळी व्यक्ती बोलत असते, त्यावेळी तिचा आत्मविश्वास किती आहे, ती व्यक्ती बोलताना किती अडखळते, उच्चार अस्पष्ट करते याची नोंद घेतली जाते. केलेल्या निरीक्षणाचे विश्लेषण करून या प्रोग्रामच्या वापरकर्त्यांला योग्य त्या सूचना केल्या जातात. तो आपला संवाद किती प्रभावी करू शकतो, याचे मार्गदर्शन केले जाते. वापरकर्त्यांला त्याने केलेल्या संभाषणाचे ध्वनिचित्रमुद्रित चित्रीकरण (व्हीडिओ) परत दाखवले जाते. या चित्रीकरणाच्या बाजूलाच एक तक्ता तयार करून त्याच्या हालचालींचे, हावभावांचे आणि इतर खाणाखुणांचे विश्लेषण दाखवले जाते.

माक हा प्रोग्राम मानवाप्रमाणे वाटला पाहिजे व त्याने मानवासारखे वागले पाहिजे, त्याने संवादादरम्यान मानवाच्या वर्तणुकीत होणा-या बदलांनुसार स्वत:चे वर्तन ठेवले पाहिजे, असे संशोधकांना वाटत आहे.

अशा प्रकारची वास्तविकता आणण्यासाठी शास्त्रज्ञांनी या आभासी मार्गदर्शकाला हाताच्या आणि बसण्याच्या स्थितीमधील हालचाली, चेह-यावरील हावभाव, टक लावून निरीक्षण करून बोलताना होणा-या ओठांच्या हालचाली प्रदान केल्या आहेत. हे सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी शास्त्रज्ञांना दोन वर्षे लागली. याच्या चाचण्या एमआयटीच्या ९० विद्यार्थ्यांवर करण्यात आल्या. या चाचण्यांच्या साहाय्याने त्यांनी या विद्यार्थ्यांना भावी काळात त्यांना नोकरी देणा-या वरिष्ठांशी आत्मविश्वासाने कसे बोलावे याचे मार्गदर्शन करण्यात आले.

या मार्गदर्शनामुळे खूपच चांगले परिणाम दिसून आले असल्याचे माक तयार करणा-या शास्त्रज्ञांच्या पथकाने सांगितले आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version