Home महाराष्ट्र कोकण ६९७ प्राथमिक शाळांवर टांगती तलवार

६९७ प्राथमिक शाळांवर टांगती तलवार

0

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६९७ प्राथमिक शाळा बंद करण्याबाबत शिक्षण विभाग विचार करत असून या शाळांचा अहवाल शिक्षण विभागाने मागवला आहे.

संग्रहित छायाचित्र

सिंधुदुर्ग- २० पटसंख्येपेक्षा कमी पटसंख्या असणा-या जिल्ह्यातील ६९७ प्राथमिक शाळा बंद करण्याबाबत शिक्षण विभाग विचार करत असून या ६९७ प्राथमिक शाळांचा अहवाल शिक्षण विभागाने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे मागवला आहे. हा अहवाल तयार करण्याचे काम सुरू असून या अहवालावरून या शाळा बंद कराव्या की करू नये, याबाबत शिक्षण विभाग निर्णय घेणार आहे.

पहिली ते चौथीपर्यंतच्या ६७१ शाळा तर सातवीपर्यंतच्या २६ शाळा अशा एकूण ६९७ शाळा आहेत. १० पेक्षा कमी पटसंख्या असणा-या ३५३ शाळा आहेत. तर १० पेक्षा कमी पटसंख्या असणा-यांमध्ये सातवीपर्यंतची एक शाळा आहे. ५ वीपर्यंतच्या १२० शाळा आहेत. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १४७६ प्राथमिक शाळा आहेत. यापैकी ६९७ शाळा बंद करण्याबाबत विचार सुरू आहे.

देवगड तालुक्यात ९८, दोडामार्गात ५१, कणकवलीत ११२, कुडाळ तालुक्यात १००, मालवणमध्ये ११५, सावंतवाडीत १०२, वैभववाडीत ६१, तर वेंगुर्ले तालुक्यात ५८ शाळा २० पेक्षा कमी पटसंख्या असणा-या आहेत.

या शाळा बंद करू नये, अशी शिक्षण समितीचे मत आहे. मात्र, कमी पटसंख्या असणा-या शाळा बंद करण्याचा सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करून त्या शाळेतील मुलांना नजीकच्या शाळेत घालण्यात येणार आहे. यासाठी प्रवासखर्च सरकारतर्फे करण्याचा सरकारचा विचार सुरू आहे. मात्र, याबाबत अजूनही शिक्षण विभागाने ठाम निर्णय घेतलेला नाही. मात्र, यातील काही शाळा बांधकाम विभागाने दुरुस्त केलेल्या आहेत. तसेच ब-याच शाळांना बेंचेस देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

जर शाळा बंद करायच्या आहेत, तर त्या दुरुस्त कशाला केल्या असा सवाल शिक्षण समिती सदस्यांनी केला आहे. या शाळा बंद केल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांना इतरत्र हलवण्यात येणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version