Home महाराष्ट्र कोकण काँग्रेसने केसरकरांना अस्मान दाखवले

काँग्रेसने केसरकरांना अस्मान दाखवले

1

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार नगरपरिषदांच्या ६८ जागांपैकी तब्बल निम्म्या जागा काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसने जिंकल्या.

कणकवली- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी या चार नगरपरिषदांच्या ६८ जागांपैकी तब्बल ३० जागा काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसने जिंकल्या आहेत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांना अस्मान दाखवले आहे. सावंतवाडी नगरपरिषदेत नगराध्यक्ष भाजपाचा आला तरी ८ जागा काँग्रेसने जिंकल्या. त्यामुळे केसरकरांची झोप उडाली आहे.

देवगडमध्ये आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्त्वाखाली १७ पैकी १० जागा जिंकून आणि नगराध्यक्षपदाची जागा जिंकून देवगड नगरपरिषदेवर काँग्रेसने पूर्ण कब्जा केला आहे. देवगड, मालवण, वेंगुर्ले आणि सावंतवाडी या नगरपरिषदांत ६८ पैकी २९ जागा काँग्रेसने जिंकल्या. तर विजयी झालेल्या पाच अपक्ष काँग्रेस पुरस्कृत होते. त्यामुळे ६८ पैकी ३४ जागा (बरोबर ५० टक्के) काँग्रेसने जिंकल्या. काँग्रेसच्या या जागांसोबतच राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि अपक्षांची संख्या ३८ झाली आहे.

रात्री उशिरापर्यंत आलेल्या निकालांमध्ये नगराध्यक्षपदी काँग्रेसने २१ ठिकाणी विजय मिळवला असून, राष्ट्रवादी १९ ठिकाणी विजयी आहे. तर भाजपा ५२ आणि शिवसेना २३ अशी आघाडी घेतली तरी भाजपाला बहुमत मिळाले नसल्यामुळे त्यांची पूर्ण कोंडी झाली आहे.

आमदार नितेश राणे यांनी देवगड जिंकले

देवगड- कणकवली विधानसभा मतदारसंघातील देवगड नगरपरिषदेच्या निवडणुकीत कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी काँग्रेसला बहुमत मिळवून दिले आहे. देवगडमध्ये ज्येष्ठ नेते नारायण राणे यांची सभा झाल्यानंतर वातावरण काँग्रेसला अनुकूल झाले होते. गेले १५ दिवस देवगडमध्ये मुक्काम ठोकून नितेश राणे यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांसह देवगड घुसळून काढले होते. तेथील जनतेचा विश्वास संपादन केला. त्यामुळे १७ पैकी १० जागा जिंकून पूर्ण बहुमत मिळाले. देवगड नगरपालिकेत नगराध्यक्षाची निवडणूक थेटपणे नव्हती. आता नगरसेवकांकडूनच अध्यक्षपदाची निवडणूक होईल आणि काँग्रेसचा अध्यक्ष विराजमान होईल.

1 COMMENT

  1. जनता दाखवेलच येत्या निवडणुकीत कोणासोबत आहे ते – काँग्रेस सोबत कि सत्य सोबत !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version