Home विज्ञान तंत्रज्ञान ओपोचा दोन रेअर कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच

ओपोचा दोन रेअर कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच

1

गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत असलेला ओपोचा ‘ओपो आर ११’ हा स्मार्टफोन कंपनीने लाँच केला आहे.

नवी दिल्ली- गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत असलेला ओपोचा ‘ओपो आर ११’ हा स्मार्टफोन कंपनीने लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत कंपनीने गुलदस्त्यात ठेवणे पसंत केले असले तरी या स्मार्टफोनची किंमत ३१ हजार २०० रुपये असल्याचा दावा करण्यात येत आहे.

हा नवा स्मार्टफोन सेल्फीप्रेमींना आकर्षित करणारा आहे. या स्मार्टफोनचे खास वैशिष्टय म्हणजे यामध्ये दोन रेअर कॅमेरे देण्यात आले आहेत.  एक कॅमेरा २० मेगापिक्सल तर दुसरा १६ मेगापिक्सलचा आहे. तर फ्रंट कॅमेरा २० मेगापिक्सलचा आहे.

‘ओपो आर ११’ हा स्मार्टफोन सर्वप्रथम चीनच्या मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. हा स्मार्टफोन सध्या काळा, गोल्ड आणि रोझ गोल्ड या तीन रंगामध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनसाठी मेटल युनीबॉडी डिझाईनचा वापर करण्यात आला आहे.

‘ओपो आर ११’चे काय आहेत फिचर्स?

» ५.५ इंचाचा डिस्प्ले

» ६४ जीबी मेमरी

» १.९ गिगाहर्टझ ऑक्टाकोर प्रोसेसर

» चार जीबी रॅम

»२० मेगापिक्सेल आणि १६ मेगापिक्सल रेअर कॅमेरा

»२० मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा

» १०८० X १९२० पिक्सल स्क्रिन रेझ्योल्यूशन

» अँड्रॉईड ७.१ नुगा

» वायफाय, एनएफसी, ब्लूटूथ.

» २९०० एमएएच बॅटरी

» किंमत -३१ हजार ९९० रुपये

1 COMMENT

  1. हा चिनी बनावटीचा आहे तर मग पहा घायचा कि नाही ते!
    मी तर न्हाई घेणार!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version