Home महामुंबई ठाणे घंटागाडी कर्मचा-यांचे कामबंद आंदोलन

घंटागाडी कर्मचा-यांचे कामबंद आंदोलन

0

कल्याण महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांच्या आदेशानुसार मंगळवारी मोहने येथील एनआरसी कंपनीत कचरा टाकण्यासाठी गेलेल्या घंटा गाडी कर्मचा-यांना स्थानिक नागरिकांनी मारहाण केल्याची आणि घंटा गाडय़ांची तोडफोड केल्याची घटना घडली होती. 

कल्याण- कल्याण महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांच्या आदेशानुसार मंगळवारी मोहने येथील एनआरसी कंपनीत कचरा टाकण्यासाठी गेलेल्या घंटा गाडी कर्मचा-यांना स्थानिक नागरिकांनी मारहाण केल्याची आणि घंटा गाडय़ांची तोडफोड केल्याची घटना घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी काही काळ घंटा गाडी कर्मचा-यांनी काम बंद आंदोलन केले.

आर्थिक वर्ष संपण्यास काही दिवसांचा कालावधी उरला असल्याने मालमत्ता कर वसुलीसाठी पालिका आयुक्तांनी कठोर पाऊले उचलली आहेत. त्याचा एक भाग म्हणून वारंवार नोटीसा देवूनही कोटय़वधींची थकबाकी न भरणा-या थकबाकीदारांच्या मालमत्तेत कचरा टाकण्याचे आदेश पालिका महापालिका आयुक्तांनी अधिका-यांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर ५५ कोटींची थकबाकी असणा-या एनआरसी कंपनीत कचरा टाकण्यास गेलेल्या पालिकेच्या कर्मचा-यांना काही इसमांनी बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या.

या प्रकरणी पोलीस स्थानकात केवळ गाडय़ा फोडण्यात आल्या असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. कर्मचा-यांना मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. याच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी कल्याणमध्ये घंटा गाडी कर्मचा-यांनी काम बंद आंदोलन सुरू केले.

यानंतर वरिष्ठांनी हस्तक्षेप करून कर्मचा-यांना मारहाण करणा-या विरोधात गुन्हा नोंदविण्याचे आश्वासन दिले. खडकपाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्यानंतर घंटागाडी कर्मचा-यांनी आपले आंदोलन मागे घेत काम सुरू केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version