- मंत्री मंगल प्रभात लोढा; पंडित दीनदयाळ उपाध्याय ‘विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ’साठी राज्यव्यापी तयारी
मुंबई : पंडित दीनदयाळ उपाध्याय ‘विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ’ अंतर्गत राज्यात २९ सप्टेंबरला १ हजार रोजगार मेळावे आयोजित करण्याचे नियोजन असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. या उपक्रमातून राज्यातील युवकांना अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास विभाग आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांनी समन्वयाने काम करावे, या उद्देशाने शुक्रवारी मंत्रालयातून राज्यव्यापी रोजगार मेळावा व प्लेसमेंट ड्राईव्ह संदर्भात ऑनलाइन बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते
Nashik : नाशिकच्या कळवण तालुक्यातील विसरवाडी येथील शासकीय आश्रमशाळेतील (Government Ashram School Visarwadi) आठ वर्षीय विद्यार्थिनी सृष्टी सोनवणे हिच्या मृत्यूप्रकरणी मोठी ...
या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते. रोजगार महाकुंभाच्या माध्यमातून युवकांना रोजगारासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. या बैठकीत राज्यभरात तब्बल १ हजार रोजगार मेळावे आयोजित करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. या उपक्रमात उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सक्रिय सहभाग नोंदवून राज्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील जास्तीत जास्त विद्यार्थी व युवकांना रोजगाराच्या संधींशी जोडावे, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. युवकांमध्ये रोजगाराची क्षमता आणि इच्छाशक्ती असूनही अनेकांना योग्य मार्गदर्शन व रोजगाराच्या संधींपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक व्यासपीठ उपलब्ध होत नाही. ही दरी भरून काढण्यासाठी ‘विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ’ महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, त्याचा मोठा फटका दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय ...
युवकांना रोजगारासाठी अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने सात दिवसांचे ‘प्री-प्लेसमेंट प्रशिक्षण’ देण्यात येणार आहे. नोकरीसाठी आवश्यक असलेली पूर्वतयारी, व्यक्तिमत्त्व विकास तसेच मुलाखतीला प्रभावीपणे कसे सामोरे जावे, याबाबत या प्रशिक्षणातून मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच, रोजगारासाठी निवड झाल्यानंतर युवकांना आवश्यक ते ‘पोस्ट-प्लेसमेंट प्रशिक्षण’ देण्याचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. राज्यातील युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असून, रोजगार महाकुंभाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध विभागांमध्ये समन्वय साधण्यावर भर देण्यात येत आहे.
युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधींची दारे खुली होणार
राज्यातील प्रत्येक युवकाला त्याच्या क्षमता आणि कौशल्याला साजेशी रोजगाराची संधी मिळणे आवश्यक आहे. रोजगार महाकुंभाच्या माध्यमातून युवकांना केवळ नोकरीच्या संधीच नव्हे, तर योग्य मार्गदर्शन आणि आवश्यक प्रशिक्षणाचे व्यासपीठही उपलब्ध करून दिले जात आहे. कौशल्य विकास विभाग आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्या समन्वयातून हा उपक्रम राज्यातील युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधींचे दार खुले करेल. - मंगल प्रभात लोढा, मंत्री, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग.






