बाह्यरूग्ण विभागातील नोंदणीसाठी रूग्ण व नातेवाईकांना घेता येईल
प्रायोगिक तत्वावर यूपीआयची सेवा
मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : लोकमान्य टिळक सर्वसाधारण रूग्णालय (शीव) येथे 'हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम' या प्रणालीच्या प्रायोगिक तत्वावरील अंमलबजावणीला सुरूवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात बाह्यरूग्णांची नोंदणी करणे आणि शुल्क अदा करण्यासाठी डिजिटिल पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देणे, यासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर या पथदर्शी प्रकल्पाची पाहणी अतिरिक्त आयुक्त (शहर) प्राजक्ता लवंगारे यांनी मंगळवार ८ सप्टेंबर २०२६ रोजी केली. भाजप मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या मागणीनुसार आणि सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांच्या प्रयत्नाने सुविधा प्रत्यक्षात उपलब्ध होत आहे.
FDA Action : FDA चा मोठा दणका! IRCTC आणि इस्कॉनच्या फूड आउटलेट्सवर कारवाई; नेमका काय आहे प्रकरण?
मुंबई : मुंबई आणि ठाण्यातील काही खाद्य आस्थापनांमध्ये अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन आढळून आल्याने महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने ...
पहिल्या टप्प्यात 'एचएमआयएस' प्रणालीची अंमलबजावणी करताना रूग्ण व नातेवाईकांसाठी सुलभ पद्धतीने वापरता येईल, यादृष्टीने उपाययोजना कराव्यात, अशी सूचना प्राजक्ता लवंगारे यांनी केली. दुसऱ्या टप्प्यात रुग्णांचा वैद्यकीय तपशिल नोंदविण्यासाठी 'टेक्स्ट टू स्पीच' यासारख्या अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करावा. त्यामुळे रुग्णांच्या आणि डॉक्टरांच्या वेळेची बचत होण्यासोबतच डॉक्टरांचे कामही सुलभ होईल.
लोकमान्य टिळक सर्वसाधारण महानगरपालिका रूग्णालय येथे बाह्यरूग्ण विभागात येणाऱ्या रूग्णांची नोंदणी संगणकाद्वारे करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याठिकाणी दररोज १५ हजार बाह्य़रुग्णांची नोंद करण्यात येते. या रूग्णांची वैद्यकीय माहिती नोंदवून घेत पहिल्या टप्प्यातील नोंदणी करण्यात येईल. त्यामुळे प्रणालीच्या वापरा अंतर्गत रुग्णांचा नोंदणी प्रक्रियेतील प्रतिक्षा कालावधी कमी होण्यास यामुळे मदत होणार आहे.
बाह्यरूग्ण सेवेसाठी आवश्यक असणारे नोंदणी शुल्क 'मोबाईल युपीआय पेमेंट'द्वारे अदा करण्याची सुविधाही त्याच खिडकीवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. लोकमान्य टिळक सर्वसाधारण रूग्णालयात विविध वैद्यकीय उपचारासांठी मोठ्या प्रमाणात रूग्ण दाखल होत असतात. अशावेळी रूग्णांना नोंदणीसाठी रोख पैसे अदा करण्याची सुविधा उपलब्ध करून देतानाच ऑनलाईन पद्धतीने युपीआय पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता - लवंगारेे यांनी दिले होते. पहिल्या टप्प्यातील एचएमआयएस प्रणालीचा वापर आता या रूग्णालयात अंतर्गत स्तरावर सुरू करण्यात आला आहे.
बाह्यरूग्ण विभागाच्या नोंदणी खिडकीच्या ठिकाणी 'डिजिटल पेमेंट'साठी १० पीओएस मशीन लावण्यात आल्या आहेत. तसेच एचएमआयएस प्रणालीच्या पहिल्या टप्प्यातील पथदर्शी प्रकल्पाचीही अंमलबजावणी करण्यात आली आहे. रूग्णांनी नोंदणीसाठी आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक आदी माहिती देणे गरजेचे आहे.
'एचएमआयएस' प्रणाली अंमलबजावणीच्या
दुसऱ्या टप्प्यात रूग्णांचा इतिहास, चिकित्सा अहवाल, सोनोग्राफी, एमआरआय, सीटी स्कॅन यासारख्या वैद्यकीय तपासण्यांचे ऑनलाईन शुल्क अदा करण्यासाठी 'डिजिटल पेमेंट'चा पर्यायदेखील भविष्यात उपलब्ध होणार आहेत. तसेच 'एचएमआयस' प्रणालीही संपूर्ण क्षमतेने अंमलात आणण्याचा रूग्णालय प्रशासनाचा मानस आहे.
प्रायोगिक तत्वावर डिजिटल पेमेंटचा पर्याय
लोकमान्य टिळक सर्वसाधारण रूग्णालयात दररोज विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाह्य रूग्ण येत असतात. या सर्व रूग्णांची 'एचएमआयएस' प्रणालीअंतर्गत डिजिटल नोंद घेण्यात येत आहे. या नोंंदणीसोबतच रूग्ण आणि नातेवाईकांना डिजिटल पेमेंटचा पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे रोख पैसे किंवा सुट्टे पैसे देण्याची गैरसोय टाळत आता डिजिटल पेमेंटचा कॅशलेस पर्याय रूग्णांसाठी उपलब्ध झाला आहे.






