Marathi Actor Facebook Post : एका मराठमोळ्या अभिनेत्याच्या फेसबुक पोस्टने त्याच्या चाहत्यांसोबत पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली. कारण फेसबुक पोस्ट खळबळ उडवणारीच होती. मराठीतील प्रसिद्ध अभिनेता विकास समुद्रे यानं फेबुकवर आत्महत्या करत असल्याची पोस्ट केली आणि खळबळ माजली. अभिनेत्यानं केलेल्या पोस्टखाली चाहत्यांकडून कमेंट्स पडल्या आणि त्यासोबतच ही पोस्ट पोलिसांकडे पोहोचली. पोलिसांनी तात्काळ अभिनेत्याशी संपर्क साधला. पण, प्रकरण काहीतरी भलतंच निघालं.
माझी पोस्ट टायपिंग errors मुळे...
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी विकास समुद्रेशी संपर्क साधला. तेव्हा त्याने पोस्ट लिहिताना त्याच्याकडून टायपिंग मिस्टेक झाल्याचं सांगितलं. विकास समुद्र सुखरूप असून त्याने कोणत्याही प्रकारे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला नाही.विकास समुद्रेच्या टायपिंग मिस्टेकमुळे मोठी खळबळ उडाली. विकासनं स्वत: फेसबुकवर नवी पोस्ट शेअर करत तो सुरक्षित असल्याचं सांगितलं. त्याने नव्या पोस्टमध्ये लिहिलंय, "I m comiting suicide ... अशी माझी पोस्ट टायपिंग errors मुळे झाली ... I m doing drama अशी पोस्ट करायची होती मला.""काळजी नसावी .. मी सुरक्षित आहे ... Thanks for ur love", असं म्हणत विकासने तो सुरक्षित असल्याचं सांगितलं.
अशी वेळ कोणावरच येऊ नये...
अभिनेता विकास समुद्रे याच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, अभिनेता विकास समुद्रे गेली अनेक वर्ष मराठी सिनेसृष्टीत काम करतोय. त्याने आजवर अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये काम केलंय. पण, खरी प्रसिद्धी 'नवरा माझा नवसाचा' या सिनेमामुळे मिळाली. विकास समुद्रे यानं बऱ्याच विनोदी भूमिका साकारल्यात. मागील काही वर्ष तो इंडस्ट्रीपासून दूर होता. तो ब्रेन स्ट्रोकशी झुंज देत होता. त्याची प्रकृती ठीक नव्हती, अशी वेळ कोणावरच येऊ नये. हा काळ माझ्यासाठी खूप वाईट होता, असंही अभिनेत्यानं एका पॉडकास्टमध्ये बोलताना सांगितलं होत. ब्रेन स्ट्रोकमधून तो आता बाहेर आला असून त्यानं कामालाही सुरूवात केली.
अन् कमेंट्सचा पाऊस
मराठी अभिनेता विकास समुद्रेच्या फेसबुक अकाउंटवरुन आत्महत्या करत असल्याची पोस्टमुळे चाहत्यांकडून काळजी व्यक्त करण्यात आली. अभिनेत्याच्या काळजीनं अख्खं कमेंट सेक्शन भरुन गेलं. तसेच, अनेकांनी कमेंट करुन अभिनेत्याला समजावण्याचाही प्रयत्न केला. जर अभिनेत्याने पुन्हा फेसबुक पोस्ट करतटायपिंग मिस्टेक सांगितली असली तरी त्याच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त करत शंका उपस्थित केली आहे. एका चाहत्यानं लिहिलंय, "विकास, खूप फरक आहे दोन वाक्यात. असो.. दीर्घायुषी भव." दुसऱ्यानं लिहिलंय, "Sir u scared us we need u live long Thanks for the clarification." असं म्हटलंय.






