मुंबई: मुंबईमध्ये अपघाताचे सत्र पाहायला मिळत आहेत. कोस्टल रोडवर भरधाव BMW कारच्या भीषण अपघातानंतर दहिसर पूर्वेतही अपघाताची घटना समोर आली आहे. शनिवारी मध्यरात्री दहिसर पूर्वेतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर एक भरधाव बाईक डिव्हायडरला धडकल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. एक्स्प्रेस हायवेवर भरधाव वेगाने असणाऱ्या बाईकचा स्पीडवरील नियंत्रण न राहिल्यामुळे भीषण अपघात घडल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
BEST Bus Fire : मुलुंडमध्ये बेस्ट बस आणि ट्रॅव्हल बसची समोरासमोर धडक; बसच्या बोनेटला आग, चालक जखमी
मुंबई : मुंबईतील मुलुंड पश्चिम परिसरात रविवारी पहाटे बेस्ट बस आणि खासगी ट्रॅव्हल बसची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या धडकेनंतर बेस्ट बसच्या ...
दहिसर पुर्वेतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या बाईकने डिव्हायडरला धडक दिल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या आशिष दोंडे (३७) आणि एरिस्टन निकम (३९) बाईकस्वारांची नावे आहेत. हे दोघेही आयटी क्षेत्रात नोकरीला होते. शनिवारी मध्यरात्री एका रेस्टॉरंट आणि बारमधून परत येत असताना हा अपघात घडला. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री २.३० वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. आशिष दोंडे बाईक चालवत होता, त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला.
Coastal Road Accident : मुंबई कोस्टल रोडवर भरधाव बीएमडब्ल्यूचा भीषण अपघात! हवेत अनेकदा पलटी, तिघांचा मृत्यू; CCTV फुटेज समोर
मुंबई : मुंबईच्या कोस्टल रोडवर रविवारी, २० सप्टेंबर रोजी पहाटे भरधाव BMW कारचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी ...
दहिसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी बाईकच्या पुढे एक कार होती. बाईकचा वेग जास्त असल्यामुळे ती डिव्हायडरला जाऊन धडकली. बाईक डिव्हायडरला जाऊन इतक्या जोरात धडकली की, त्या धडकेमध्ये दोघेही बाईकस्वार लांब जाऊन पडले. दोघांनाही जबर दुखापत झाली असून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. आयटी क्षेत्रात नोकरी करणारे हे दोन्हीही तरूण एका रेस्टॉरंट आणि बारमधून घरी परत येत होते. घरी परतत असताना त्यांच्या बाईकचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोघांनाही आपले प्राण गमवावे लागले आहे. आशिष दोंडे मालाडचा रहिवासी असून एरिस्टन निकम कांदिवलीतील रहिवाशी होता.
दरम्यान, अपघात झाल्यानंतर तातडीने त्या दोघांनाही पोलिसांनी जवळच्या एका सरकारी रुग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, त्यांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे. दहिसर पोलिसांनी या घटनेसंदर्भात दोन अपघाती मृत्यूंची नोंद केली आहे. अद्याप कोणाच्याही विरोधात एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही.