Thursday, September 24, 2026

Malabar Hill Reservoir : मलबार हिल टेकडीवर नवीन जलाशय, पण ३०८ झाडे वाचवून

Malabar Hill Reservoir : मलबार हिल टेकडीवर नवीन जलाशय, पण ३०८ झाडे वाचवून

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मलबार टेकडी जलाशय टाकीचे बांधकाम तोडून त्याठिकाणी नव्याने जलाशय उभारताना मोठयाप्रमाणात झाडे कापण्यात येत असल्याने याला मोठ्यास्तरावर विरोध झाला होता. परंतु आता आयआयटी रुरकीने आराखड्याचे पुनरावलोकन केल्यानंतर ३८० झाडांच्या तुलनेत आता ८२ झाडे कापावी लागणार आहे. त्यामुळे मलबार हिल जलाशयाच्या बांधकामांमध्ये आता ३८० झाडांच्या तुलनेत ३०८ झाडे वाचली गेली आहेत.

फिरोजशाह मेहता गार्डन येथील मलबार टेकड़ी जलाशयाच्या पुनबौधणीचे काम महानगरपालिकेकडून हाती घेण्यात आले आहे. या कामात ३८० झाडे बाधित होत असल्याने त्याला होणारा स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमी यांचा विरोध केला. हा विरोध लक्षात घेऊन बाधित झाडांची संख्या मर्यादित ठेवण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेने आयआयटी-रुरकी यांच्या माध्यमातून विविध पर्यायांची तपासणी करून मलबार हिल जलाशयाच्या पश्चिम बाजूस, कर्मचारी निवासस्थाने आणि पंपिंग स्टेशनच्या जागेवर ५२ दशलक्ष लिटर क्षमतेचा तीन-स्तरीय जलाशय बांधण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. याशिवाय नवीन व्हॉल्व्ह गॅलरीचे बांधकाम करणे इत्यादी कामांचा आराखडा तथा प्रस्ताव प्रकल्प सल्लागार पेडणेकर अँड असोशिएट्स यांनी बनवले होते. या प्रस्तावाचे पुनरावलोकनाच्या कामासाठी आयआयटी रूरकी या संस्थेची मदत घेण्यात आली आहे.

याबाबतचा प्रस्ताव मंजुरी असता जुने जलायश तोडून नवीन बांधण्याची गरज नाही,असा सल्ला सल्लागार कंपनी आणि तज्ज्ञांनी दिला आहे. मग पर्यायी जलाशयाचा निर्णय काय घेण्यात आला आहे अशी विचारणा काँग्रेसचे अश्रफ आझमी यांनी करत जलाशयाच्या बाधकामाचा इतिहास सांगितला. तर यशवंत किल्लेदार यांनी ३८० झाडे येथील नवीन जलाशयाच्या बांधकामांमध्ये बाधित होणार होती. याला स्थानिकांचा विरोध होता. मग आता ५२ दशलक्ष लिटर क्षमतेचे जलाशय बांधतांना किती झाडे बाधित होत आहे, काही झाडे कमी झाली आहेत का असा सवाल केला. तसेच आयआयटी मुंबई ऐवजी आयआयटी रुरकीचा सल्ला का घेण्यात आला आहे असा सवाल केला. यावर प्रशासनाच्यावतीने उत्तर देताना अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा यांनी या जलाशयाच्या बांधकामासाठी ३८९ झाडे बाधित होणार होती ही वस्तूस्थिती आहे. पण सल्लागाराने बनवलेल्या प्रस्तावाचे पुनरावलोकन आयआयटी रुरकी यांनी केले आणि त्या त्यामध्ये ३८० झाडांच्या तुलनेते केवळ ८२ झाडे कापली जातील असा आराखडा बनवला. त्यामुळे सुमारे ३०८ झाडे वाचवली जाणार असल्याचे सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा